ई ना चोलबे..; निवडणूक निकालांवर भन्नाट मीम्स; टीएमसी-काँग्रेसची उडवली खिल्ली
पाच राज्यांच्या निवडणूक निकालांवरून सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. टीएमसी आणि काँग्रेस पक्षांची युजर्स खिल्ली उडवत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, भाजप पश्चिम बंगालमध्ये आघाडीवर आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी इथल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांपडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज (4 मे) सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. काही तासांतच निकालांची दिशा स्पष्ट होताना दिसत असून पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजप आघाडीवर आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस सध्या पिछाडीवर आहे. तमिळनाडूच्या निवडणुकीत अभिनेता थलपती विजय यांच्या पक्षाने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या राज्यांमध्ये अंतिम निकाल काहीही लागो, पण त्यापूर्वीचे कल पाहून सोशल मीडियावर युजर्सनी भन्नाट मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या मीम्सच्या माध्यमातून एकीकडे भाजपचे समर्थक आनंद साजरा करत आहेत, तर टीएमसीचे कार्यकर्ते नाराज आहेत. इतकंच नाही तर काँग्रेस पक्षाचीही खिल्ली उडवली जात आहे.
आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजप 191 जागांवर आणि टीएमसी 97 जागांवर आघाडीवर आहे. आसाममध्ये 126 पैकी भाजप 97 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 26 जागांवर आघाडीवर आहे. तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांचा टीव्हीके 104 जागांवर आघाडीवर असून हाच राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरत आहे. पुद्दुचेरीमध्येही भाजप आघाडीवर आहे. (हे आकडे सतत बदलत आहेत).
पहा भन्नाट मीम्स-
Results dekh ke Modi Ji 😎#electionresult2026 pic.twitter.com/Lnx1BDUFxg
— Byomkesh (@byomkesbakshy) May 4, 2026
West Bengal #electionresult2026 in a nutshell: pic.twitter.com/viI3zYuJil
— FalconUpdatesHQ (@FalconUpdatesHQ) May 4, 2026
सोशल मीडियावर अनेकांनी ‘धुरंधर’मधील अक्षय खन्नाच्या गाजलेल्या डान्स स्टेपवरून मीम्स शेअर केले जात आहेत. तर विनोदी व्हिडीओंमधून असंही दाखवलं जात आहे की, भाजप सातत्याने पुढे जात आहे आणि टीएमसी त्यांना गाठण्यात अयशस्वी ठरतोय. दरम्यान अनंत सिंह यांच्या फोटोसोबत एक मीम शेअर केलं जात आहे. ज्यावर लिहिलं आहे की, ‘हम ई सब मानबे नहीं करते है’ (आम्ही या सगळ्यावर विश्वास ठेवत नाही). त्यांना डीएमके आणि काँग्रेसचे समर्थक म्हणूनही या मीममध्ये चित्रित केलं जात आहे. तसंच निकालांची पर्वा नसल्याबद्दल लोक काँग्रेस पक्षाचीही खिल्ली उडवत आहेत. काँग्रेस स्वत:च्याच वैयक्तिक आनंदात मग्न असून निकाल पाहण्यात व्यस्त आहेत, असं या मीममध्ये दाखवलं गेलंय.