
भारत हा लोकशाही देश आणि निवडणुका या लोकशाहीचं प्रतीक आहे. ठरावीक कालावधीनंतर देशात कुठे ना कुठे निवडणुका पार पडत असतात. मग त्या लोकसभेच्या असो, विधानसभा की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असो किंवा पोटनिवडणुकीची रणधुमाळी असो.. योग्य उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी ही मतदारांची असते. वय वर्षे 18 असलेल्या आणि मतदार यादीत नाव नोंदवलेला मतदार योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदान करतो. निवडणुका जिंकणं ही भारतात सहज सोपी गोष्ट नाही. तुल्यबल विरोधी उमेदवार असेल तर जिंकण्यासाठी कस लागतो. यासाठी उमेदवाराचा स्वभाव, त्याची काम करण्याची हातोडी, प्रामाणिकपणा या सर्वच गोष्टी मतदारांसाठी महत्त्वाच्या असतात. पण अनेकदा मतदारांना प्रलोभन देऊन भूलवण्याची रणनीतीही अवलंबली जाते. त्यामुळे निवडणूक आयोग निवडणूक काळात बारीक नजर ठेवून असते. अनेक ठिकाणी भरारी पथकं कार्यरत असतात आणि असा कोणताही प्रकार घडू नये यासाठी प्रयत्नशील असतात. तुम्ही ऐकलं असेल, वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर वाचलं असेल किंवा न्यूज चॅनेलवर पाहीलं असेल की निवडणूक आयोग निवडणूक काळात कारवाई करत रोख रक्कम, दारू आणि सोनं चांदी जप्त करते. पण...