AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ready Reckoner Rate: सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा; रेडीरेकनर दर जैसे थे, खिशाला नाही झळ

Ready Reckoner Rate: आखातातील तणाव, ऊर्जा संकट अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. रेडीरेकनर दर जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मंदीवर मात करता येईल. तर ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त झळ बसणार नाही.

Ready Reckoner Rate: सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा; रेडीरेकनर दर जैसे थे, खिशाला नाही झळ
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासाImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 01, 2026 | 11:34 AM
Share

Ready Reckoner Rate: सर्वसामान्यांसह फडणवीस सरकारव् बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला. सध्याची जागतिक परिस्थिती व बांधकाम क्षेत्रातील मंदी लक्षात घेऊन राज्य शासनाने रेडीरेकनरबाबत मोठा निर्णय घेतला. 1 एप्रिल पासून सुरू होणार्‍या नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात कोणतीच वाढ करण्यात आलेली नाही. राज्यात सर्व ठिकाणी नवीन आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरचे दर २०२६ -२७ या वर्षाचेच कायम ठेवण्यात आले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. कॉन्फेडरेशन्स ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया (क्रेडाई), दस्त लेखनिक यांच्या सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्य केल्या आहेत.

रेडीरेकनरमध्ये कोणतीही दरवाढ

मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागात काम करत असताना मालमत्तेचा रेडीरेकनरची घोषणा करण्याचा कालचा दिवस होता. यावर्षीचा रेडीरेकनरमध्ये कोणतीही दरवाढ केलेली नाही. १५ ते १८ टक्के दरवाढ अपेक्षित होती. युद्धजन्य परिस्थिती आणि महागाईचा भार मालमत्तांवर येऊ नये यासाठी दर तसेच ठेवले आहेत. डीपी प्लान झाल्यानंतर त्या भागाचा दर जाहीर नसतो, २०२५-२६ चा दर तोच लागू केला आहे, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

योजनांमध्ये काही बदल झालेत, तिथे पण हाच दर ठेवला आहे. पुढच्या काळात मेट्रो शहरांमध्ये झोन मायक्रोझोनिंग करायचे आणि वेगवेगळे दर राहतील. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, छत्रपती संभाजीनगर मध्ये हे कार्य अगोदर करू. परिणामी अव्वाच्या सव्वा रेट लागणार नाही. २०११ पूर्वी शासकीय जागेवर घरं बांधली आहेत. तुकडे बंदी कायदा लेआऊटमधून आम्ही हटवला आहे. २०११ पूर्वीचे बांधकाम आहेत, मात्र दीड हजारवरील बांधकाम या परीघात आणू असे त्यांनी स्पष्ट केले.

परप्रांतीय, बांगलादेशी, बाहेरुन आलेल्यांना घरं बांधता येणार नाही. आधी ५०० स्क्वेअर फूट होती आता दीड हजार चौरस फूट आपण केली आहे. परप्रांतीय लोकांची अनधिकृत घरं तोडून टाकण्यात येईल. ते रेग्युलर्राईज, नियमीत होणार नाही, असे मोठे वक्तव्य बावनकुळे यांनी केले.

जमिनी मोजणीचा कालावधी होणार कमी

जमिन मोजणीचा कालवधी कमी होईल. व्हर्जन २ साठी २-३ दिवस भूमी अभिलेखची वेबसाईट डाऊन असेल. एका सर्व्हेत ४-५ भाऊ आहेत, आणि आजूबाजूला वेगवेगळ्यांची शेती आहे, अशात एकाची शेती मोजायची असेल तर १०-१२ जणांकडून पैसे घ्यावे लागायचे. अशात, आता २०० रुपये आपण भार कमी केलाय. शर्तभंगचा कायदा आम्ही बदलला. लहान शेतकर्‍यांना देखील महसूल मंत्र्यांकडे यावं लागतं, हे योग्य नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडूनच हे निर्णय व्हायला हवेत. महसूल खात्याने नाव खराब होते आहे. ९० दिवसात केस संपवायला सांगितलं आहे. १३ हजार केसेस माझ्याकडे होत्या, ३ हजार कमी झाल्या. मी अधिकार सचिव आणि राज्य मंत्री यांना दिलेत. अशात, केसेसचा भार कमी होईल. पारदर्शकपणे काम व्हावं. रस्त्यासाठी निर्णय घेतल्याने कोणालाही कुठे जायची गरज नाही. शेतकर्‍यांचा पाणंद रस्ता मोकळा राहिला पाहिजे, असा निर्णय आमचा आहे, असे बावनकुळे यांनी बजावले.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...