What India Thinks Today | नवीन भारताच्या उभारणीत, हरियाणाचा किती वाटा, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भूमिका मांडणार

| Updated on: Feb 24, 2024 | 9:41 AM

What India Thinks Today | व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या सत्ता संमेलनात, 27 फेब्रुवारी रोजी नवीन भारताची गॅरंटी या सत्रात भारतीय जनता पार्टीचे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर सहभागी होत आहे. गेल्या 10 वर्षांत सत्ता त्यांच्या हातात आहे. या दहा वर्षांत बदलत्या हरियाणाची चर्चा ते करतील.

What India Thinks Today | नवीन भारताच्या उभारणीत, हरियाणाचा किती वाटा, मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर भूमिका मांडणार
Follow us on

नवी दिल्ली | 24 February 2024 : टीव्ही 9 नेटवर्क आपला वैचारिक मंच व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या (What India Thinks Today) माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या कॉनक्लेव्हमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीएम अरविंद केजरीवाल, एलजी मनोज सिन्हा आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सारखे दिग्गज नेता सहभागी होत आहे. व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी ‘सत्ता सम्मेलन’ मध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर पण सहभागी होतील. नवीन भारताच्या जगरहाटीत हरियाणाचे योगदान काय याची भूमिका ते मांडतील.

मनोहर लाल खट्टर भूमिका मांडणार

व्हाट इंडिया थिंक्स टुडेच्या ‘सत्ता संमेलनात’ भारतीय जनता पक्षाचे हरियाणातील मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे नवीन भारताची गॅरंटी याविषयावर भूमिका मांडतील. गेल्या दहा वर्षांपासून खट्टर यांची सत्ता आहे. त्यांच्या काळात हरियाणाने काय साध्य केले आणि अजून कोणता पल्ला गाठायचा आहे, याविषयची भूमिका ते मांडतील. देशाच्या विकासात हरियाणाचे योगदान काय, हे ते समजावून सांगतील.

हे सुद्धा वाचा

लोकसभेसह विधानसभेची तयारी

  • हा कॉनक्लेव्ह तेव्हा होत आहे, जेव्हा देशात लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष कधीपासूनच या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. हरियाणामध्ये तर दोन निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. लोकसभेनंतर या राज्यात विधानसभेची पण निवडणूक होत आहे. खट्टर या वैचारिक मंचावर हरियाणातील विकासाचे गणित मांडतील.
  • पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी 370 तर एनडीएसाठी 400 पेक्षा जास्तचा नारा दिला आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी हरियाणाच्या सर्व 10 लोकसभा जागांसाठी भाजपला विजय नोंदवावा लागणार आहे. 2019 मध्ये 10 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले होते. तोच इतिहास घडविण्यात येणार आहे.

LG मनोज सिन्हा बदलत्या काश्मीरवर भाष्य करतील

हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांच्यांशिवाय 6 इतर राज्यातील मुख्यमंत्री पण सत्ता संमेलनात सहभागी होतील. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय या वैचारिक मंचावर भूमिका मांडतील. राज्यातील घडामोडी, नवनवीन योजना आणि राज्यांच्या विकासाबाबत मत मांडतील.

सत्ता संमेलनात जम्मू-काश्मिरचे एलजी मनोज सिन्हा

सत्ता संमेलनात जम्मू-काश्मिरचे एलजी मनोज सिन्हा हे बदलत्या राज्याची कहाणी मांडतील. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे भारतीय सैन्यदलाची वीरता, शौर्यगाथेविषयी माहिती देतील. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पण सत्ता संमेलनात सहभागी होतील. त्यांच्या विचारासह या कॉनक्लेव्हचा समारोप होईल.