What India Thinks Today | कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चेची मेजवाणी; या क्षेत्रातील दिग्गज उलगडतील अनेक गुपिते, सांगतील फायदे आणि तोटे

What India Thinks Today | टीव्ही9 नेटवर्कच्या वार्षिक फ्लॅगशिप कॉन्क्लेव्ह, व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024, 25 फेब्रुवारीपासून दणक्यात सुरु होत आहे. या संमेलनात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या विषयावर चर्चा रंगणार आहे. या क्षेत्रातील दिग्गज त्यांचे विचार मांडणार आहेत.

What India Thinks Today | कृत्रिम बुद्धिमत्तेवर चर्चेची मेजवाणी; या क्षेत्रातील दिग्गज उलगडतील अनेक गुपिते, सांगतील फायदे आणि तोटे
Follow us
| Updated on: Feb 23, 2024 | 9:30 AM

नवी दिल्ली | 23 February 2024 : देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’ सलग दुसऱ्या वर्षी तुमच्या भेटीला सज्ज झाले आहे. या संमेलनात विज्ञान, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, राजकारण, प्रशासन, अर्थशास्त्र, आरोग्य, संस्कृती आणि क्रीडा विश्वातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. वार्षिक फ्लॅगशिप कॉन्क्लेव्हचे आयोजन 25 फेब्रुवारी रोजी देशाची राजधानी नवी दिल्लीत होत आहे. हे संमेलन 27 फेब्रुवारीपर्यंत असेल. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री सहभागी होतील. या कान्क्लेव्हमध्ये कृभिम बुद्धिमत्तेवर या क्षेत्रातील दिग्गज प्रकाश टाकतील. त्यामुळे जगात या नव तंत्रज्ञानाने जो धुमाकूळ घातला आहे, त्याविषयीची तुमची समज विस्तृत होईल. तुम्हाला एआयचे फायदे आणि तोटे कळतील.

डॉ. शैलेश कुमार: चीफ डेटा सायंटिस्ट रिलायन्स जिओ

डॉक्टर शैलेश कुमार हे रिलायन्स जिओच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचे चीफ डेटा सायंटिस्ट आहेत. रिलायन्स जिओ यांच्याच नेतृत्वात हे तंत्रज्ञान विकसीत करत आहे. डॉक्टर शैलेश कुमार यांचे 20 हून अधिक इंटरनॅशनल रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या नावे 20 ऑर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशिन लर्निंगचे पेटंट आहे. 2015 एनालिटिक्स इंडिया मासिकाने त्यांचा टॉप 10 डेटा सायंटिस्टच्या यादीत समावेश केला होता. यापूर्वी ते ओला कॅबचे उपाध्यक्ष होते. ते Third Leap आणि EdTech या स्टार्टअपचे सह संस्थापक पण आहेत. EdTech स्टार्टअप हे वैयक्तिक गणित मार्गदर्शक आहे, जे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत आहे.

हे सुद्धा वाचा

आलोक शुक्ला: डायरेक्टर AI व्हिजन, सॅमसंग रिसर्च

आलोक शुक्ला, कॅमेरा टेक्नॉलॉजीमध्ये एआयच्या वापरासाठी सुपरिचीत आहे. त्यांनी गॅलेक्सी Z फोल्ड4 च्या डिस्प्ले अंतर्गत दिलेल्या कॅमेऱ्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहे. त्यांनी भारतात एआय व्हिजन सोल्यूशन्स टीमचे नेतृत्व केले आहे. तसेच एआय इमेज रेस्टोरेशन अल्गोरिदम डेव्हलप करण्यावर पण लक्ष केंद्रीत केले आहे. स्मार्टफोन डिस्प्लेमध्ये कोणत्याही नुकसानीविन विस्तृत कॅमेरा देणे, हे त्यांचे लक्ष्य आहे.

डॉ. अनुराग मैराल: स्टॅनफोर्ड प्रोफेसर, स्पेशलायझेशन AI

डॉक्टर अनुराग मैराल स्टॅनफोर्ड विद्यापीठामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बायो टेक्नॉलॉजीचे नावाजलेले प्राध्यापक आहेत. वैज्ञानिकाच्या सीमा ओलांडून ते एआय आणि बायोटेक यांच्या मदतीने आरोग्य, कृषी, पर्यायवरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या अतुलनिय कामगिरीमुळे वैयक्तिक औषधी मात्रा आणि बायोइनफॉर्मेटिक्स विषयात अमुलाग्र बदल आणि प्रभावी प्रगती साधता आली आहे. एक नेता, शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अनुराग मैराल हे नवतरुणांना नक्कीच प्रेरित करतील.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.