
स्वातंत्र्य दिनाची देशभरात तयारी सुरू आहे. ही तारीख म्हणजे भारतीय जनतेच्या जीवनाची नवीन सुरुवात असते. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या तावडीतून भारत स्वतंत्र झाला. एका नव्या युगाची सुरुवात झाली. स्वातंत्र्य दिनाचा उत्सव देशभर साजरा केला जातो. सर्व धर्मीय लोक या उत्सवात सामील होतो. देशभर गोडधोड केलं जातं. प्रत्येक वस्तीत विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात. पण स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण आणि प्रजासत्ताक दिनाचं ध्वजारोहण यात जमीन अस्मानचा फरक असतो हे लोकांना माहीतच नाही. दोन्ही गोष्टी एक नसतात. त्या वेगवेगळ्या असतात. 26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन) आणि 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) दोन्ही दिवशी तिरंगा झेंडा फडकवला जातो. पण त्याच्या पद्धतीत फरक असतो. 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण (Flag Hoisting) केलं जातं. तर 26 जानेवारी रोजी झेंडा फडकवला जातो म्हणजे (Flag Unfurling) केलं जातं. ...