या एका चुकीमुळे रेल्वे रिझर्व्हेशन कन्फर्म होत नाही, हा पर्याय न निवडल्याने होतो घोळ; वाचा काय करावं?

IRCTC ने आपल्या संकेतस्थळावर तसेच अॅपवर तिकीट बुक करताना एक पर्याय दिलेला असतो. या पर्यायाला ऑप्ट ऑप्शन असे म्हणतात. हे फिचर खूपच कामाचे असते.

या एका चुकीमुळे रेल्वे रिझर्व्हेशन कन्फर्म होत नाही, हा पर्याय न निवडल्याने होतो घोळ; वाचा काय करावं?
railway ticket reservation
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 16, 2026 | 7:34 PM

How to confirm Railway Ticket : रेल्वेने प्रवास करायचा असेल तर आपण जागेचे रिझर्वेशन करतो. जागा रिझर्व्ह असेल तर आपल्याला रेल्वेप्रवास खूप सोपा आणि सुखकर होते. परंतु रेल्वेने रोज कोट्यवधी लोक प्रवास करतात. म्हणूनच अनेकदा तिकीट बुक करूनही आपण वेटिंग लिस्टमध्ये राहतो. आपण पैसे भरूनही आपल्याला जागा मिळत नाही. परंतु आयआरसीटीसीने असा एक खास पर्याय दिलेला आहे, ज्याची मदत घेऊन तुम्ही आरामात प्रवास करू शकता. हा पर्याय कोणता? तिकीट कन्फर्म मिळावे यासाठी नेमके काय करायचे असते? ते जाणून घेऊ या…

तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढते

IRCTC ने आपल्या संकेतस्थळावर तसेच अॅपवर तिकीट बुक करताना एक पर्याय दिलेला असतो. या पर्यायाला ऑप्ट ऑप्शन असे म्हणतात. हे फिचर खूपच कामाचे असते. तिकीट बुक करतानाच आपल्याला हा ऑप्शन निवडावा लागतो. हा पर्याय निवडला की तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढते. विशेष म्हणजे हा पर्याय निवडल्यावर तुम्हाला अतिरिक्त पैसेही खर्च करण्याची गरज नसते.

ऑप्ट पर्याय नेमके कसे काम करतो?

तिकीट चर्ट तयार झाल्यानंतर ऑप्ट पर्याय कामाला येतो. तुम्ही तिकीट बुक केल्यानंतर चर्टा तयार होऊनही तुमचे तिकीट वेटिंग लिस्ट दाखवत असेल आणि तुम्ही ऑप्ट हा पर्याय निवडलेला असेल तर आयआरसीटीसी तुम्हाला दुसऱ्या ट्रेनमध्ये रिकामी जागा शोधते. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी जाणार असाल त्याच ठिकाणी जाणारी दुसरी रेल्वे असेल तर त्या रेल्वेमध्ये रिकामी जागा आहे का? याचा आयआरसीटीसीकडून शोध घेतला जातो. तुमच्या मार्गावर दुसऱ्या रेल्वेत रिकामी जागा असेल तुम्हाला त्या रेल्वेत तिकीट दिले जाते. आणि तुमचा प्रवास सुखर होतो.

ऑप्ट पर्याय नेमका कसा निवडावा?

तुमच्या युजर आयडीने IRCTC वेबसाइट किंवा ॲपवर लॉग इन करा.

तुमच्या प्रवासाची तारीख आणि ट्रेन निवडा.

प्रवाशांची माहिती टाकल्यानंतर खाली स्क्रोल करावे.

तुम्हाला तिकीट बुक करताना Other Preferences हे सेक्शन दिसेल. त्या पर्यायात Opt Vikalp हा एक ऑप्शन दिसेल. या पर्यायावर टिक करा. त्यानंतर तुमची तिकीट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा अन्य रेल्वेत जागा देण्यासाठी विचार केला जातो.

Follow Us