जातनिहाय जनगणना अन् जातीय सर्व्हेक्षण दोघांमध्ये फरक काय? मोदी सरकारने का बदलले धोरण?

Caste Census Vs Caste Survey: बिहार, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आपआपल्या पद्धतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यातून राज्यात किती मागासवर्गीय आणि किती अतिमागासवर्गीय जातीय आहेत, त्याची माहिती समोर आली. त्या तुलनेत राजकारणात त्यांची भागेदारी होणार आहे. यामुळे मोदी सरकारला जातीय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

जातनिहाय जनगणना अन् जातीय सर्व्हेक्षण दोघांमध्ये फरक काय? मोदी सरकारने का बदलले धोरण?
Census
| Updated on: May 02, 2025 | 9:39 AM

Caste Census Vs Caste Survey: जातनिहाय जनगणनेस विरोध करणाऱ्या मोदी सरकारने बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला. मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला. आता जनगणनेबरोबर जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे. स्वातंत्र्य भारताच्या इतिहासात प्रथमच जातनिहाय जनगणना केली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत देशात जातीय सर्व्हेक्षण झाले आहेत. परंतु जातनिहाय जनगणना झाली नाही. बिहार, कर्नाटक, तेलंगणा या राज्याने जातीय सर्व्हेक्षण केले आहे. मग जातनिहाय जनगणना आणि सर्व्हेक्षण यांच्यात फरक काय? जातनिहाय जनगणना म्हणजे नेमके काय? जातनिहाय जनगणनेमधून काय साध्य साध्य होणार आहे? जातनिहाय जनगणनेमुळे सध्या आरक्षणाची असलेली 50% मर्यादा वाढेल का? ही प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. जनगणना म्हणजे एखाद्या भागामध्ये किती लोक आहेत, त्याची मोजणी करणे आहे. त्याला इंग्रजीत सेन्सस (Census) म्हणतात. जातनिहाय जनगणना करताना केवळ शिरगणती न होता इतर गोष्टींचीही मोजदाद केली जाते. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा