video : रेल्वेची सर्वात वाईट सीट कोणती ? ज्याला मिळते त्याच्या झोपेचे होते पुरते खोबरं….

रेल्वे आपल्या फायद्यासाठी रेल्वेच्या कोचमध्ये अशा प्रकारच्या रचना तयार करते की एखाद्या नशीबात ही बर्थ आली तर त्याच्या झोपेचे पुरते खोबरे झाले समजाच....

video : रेल्वेची सर्वात वाईट सीट कोणती ? ज्याला मिळते त्याच्या झोपेचे होते पुरते खोबरं....
train bad seat ever...
| Updated on: Oct 05, 2026 | 8:53 PM

 

रेल्वेने आपण कधी ना कधी प्रवास केलेला आहे. रेल्वे जलद आणि सर्वात स्वस्त प्रवासाचे साधन आहे. परंतू रेल्वेत केवल कन्फर्म तिकीट मिळणेच सुखाच्या प्रवासाची परिणिती नसते. काही आसने अशी असतात जी रेल्वेच्या प्रवासात कधी मिळू नये अशी असतात. रेल्वेच्या एसी कोचमधून तुम्ही प्रवास करत असाल आणि ही सीट जर तुमच्या नशीबी असेल तर तुमच्या झोपेचे पुरते खोबरे झाले म्हणून समजा. या सीटवर झोपताना त्रास झालेल्या एका प्रवाशाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. या प्रवाशा इतका कम नशीबी कोणीच नसेल असे हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल…

Loading...

ट्रेनचा प्रवास आणि झोपचे खोबरं

ट्रेनचा प्रवास करताना जर एखाद्या प्रवाशाला जर कोचच्या गेट जवळील सिट मिळाली तर प्रवाशांच्या झोपेचे खोबरे होते. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. १९ सेकंदाचा हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात एका युवकाने या आसनाची वेदना जगासमोर मांडली आहे. व्हिडीओतील युवकाने स्पष्ट केले आहे की कसे हे आसन मिळणे म्हणजे शिक्षेच्या बरोबर आहे. आणि या सीटला का अपशकुनी म्हटले जाते याचा पुरावाच त्याने दिला आहे.

वारंवार उघडझाप होणार दरवाजा आणि झोपमोड

ट्रेनच्या कोचमध्ये टॉयलेट आणि मुख्य गेटच्या ठिक शेजारच्या बर्थवर झोपणे म्हणजे एखादे लढाई लढण्यासारखेच आहे. या व्हायरल व्हिडीओत दाखवले आहे की एखादा प्रवासी जसा वॉशरुमला जायला उठतो तसा हा दरवाजा वारंवार उघडला जातो आणि बंद होतो. याशिवाय जेव्हा ट्रेनच्या कोणत्याही स्थानकात थांबते, किंवा प्रवासी उतरताना आणि चढतानाही दरवाजा उघडझाप केला जातो. अशात सीटवर झोपताना डोळ्याला डोळा लागत नाही हेच खरे…

प्रायव्हसी आणि आरामाचा

स्‍लीपर कोच असो की एसी कोच दरवाज्याच्या जवळील स्थिती नेहमीच कष्टदायक असते. दरवाज्याच्या जवळील सीटवर झोपल्यानंतर समस्या सुरु होते. सतत येजा करणाऱ्या प्रवाशांच्या लोकांच्या पावलांच्या आवाजाने, दरवाज्याच्या उघडझाप करण्याच्या आवाजाने आणि बाहेर गरम हवा आणि आतील थंड हवेच्या अदान प्रदानाने प्रवाशाच्या मानसिक अवस्थेची पुरती वाट लागते आणि ही सीट एखाद्या वाईट स्वप्नाप्रमाणे भासते.

येथे व्हिडीओ पाहा –

रेल्वेच्या सिटिंग अरेंजमेंट

आजच्या काळात प्रवाशी आपला प्रवास आरामदायक करण्यासाठी पैसे खर्च करत असतात. त्यावेळी अशा प्रकारची सीट अलॉटमेंट सिस्टीम प्रवाशात नाराजी निर्माण करते. रेल्वे आपल्या डिझाईनमध्ये बदल का करत नाही. अशा प्रकारच्या सीटची रचना एखाद्या प्रवाशाच्या वाट्याला येणे किती वाईट आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रीया यावेळी युजरने या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us