
लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी त्यांच्या सुरक्षे संदर्भातील एका नव्या प्रकरणाने चर्चेत आले आहे. त्यांची व्हीव्हीआयपी सुरक्षा सांभाळणाऱ्या केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाने (CRPF) या संदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून राहुल गांधी वारंवार येलोबुक प्रोटोकॉल पाळत नसल्याची तक्रार केली आहे. त्यामुळे व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेची जोखीम वाढत असते. त्यामुळे हा येलोबुक प्रोटोकॉल नेमका काय असतो ? ते पाहूयात…
भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान यांना वगळून इतर कोणाही राजकीय हस्तींच्या सुरक्षेसाठी एक निर्धारित मानक आणि दिशानिर्देशाचे नियम ठरलेले असतात.
गृहमंत्रालयाच्यावतीने मोठ्या व्हीआयपी मंडळीच्या सुरक्षेसंदर्भात गाईडलाईन्स आणि प्रोटोकॉलचे विवरण एक पुस्तिकेत दिले आहे.याच दिशानिर्देश दिलेल्या पुस्तिकेला ‘यलोबुक’ म्हटले जाते. या यलोबुकमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे वेगवेगळे स्तरापासून वेगवेगळे प्रोटोकॉल दिलेले असतात. ते संकेत पाळणे सुरक्षा असणाऱ्यांसाठी गरजेचे असते.
या यलोबुक प्रोटोकॉलच्या अंतर्गत व्हीव्हीआयपींना त्यांच्या सर्व दौरे आणि इतर कार्यक्रमाची माहिती सिक्युरिटी पर्सनल यांना देणे गरजेचे असते. त्यानुसार त्यांची जोखीम पाहून त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची योजना आखली जात असते.
‘यलो बुक’ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार वेग-वेगळ्या व्यक्तींसाठी त्यांना असलेल्या अतिरेकी, उग्रवादी, कट्टरपंथी संघटा आणि संघटीत गुन्हेगारांपासून असलेल्या धोक्यांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते.
व्हीआयपींना असलेला धोक्याची गंभीरता वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगवेगळी असते. जे कारवायांचे स्वरूप, परिस्थिती आणि दहशतवाद्यांचे संभाव्य फायदे इत्यादी घटकांवर अवलंबून असते. हेच कारण आहे की धोक्यांच्या आधारावर त्यांना Z+, Z, Y आणि X सारख्या दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली असते.
यलो बुकमध्ये एखाद्या व्यक्तीसाठी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेची आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी बनवलेल्या सर्व प्रोटोकॉलची माहिती दिलेली असते. हे प्रोटोकॉल सुरक्षा दलांनी आणि संरक्षण मिळवणाऱ्या व्यक्ती अशा दोघांनीही पाळावे लागतात.
.