पंतप्रधान मोदींनी UPI पेमेंटचा वापर कधी-कधी केलाय अन् किती होती रक्कम? जाणून घ्या
Pm modi Upi Payment : भारतामध्ये आता ऑनलाइन पेमेंट करणं ही एक साधारण गोष्ट झाली आहे. चहाच्या टपरीपासून ते पेट्रोल पंपापर्यंत सगळीकडे कॅशऐवजी आता डिजिटल पेमेंट केलं जातं. यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही मागे नाहीत, त्यांनीही आतापर्यंत अनेकदा ऑनलाइन पेमेंट केलं आहे. 2024मधला त्यांचा एक किस्सा समोर आला आहे.

केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. UPI पेमेंटवर चार्जेस लागणार आहेत मात्र ते फक्त पर्सन टू मर्चंटसाठीच लागू आहे. त्यामुळे पर्सन टू पर्सन सर्व व्यवहार हे फ्री असणार आहेत. 15 ऑक्टोबरपासून हा नियम लागू गोणार आहे. याद्वारे मर्चंटला 2 हजार रुपयांपेक्षा अधिकच्या ऑनलाइन व्यवहारावर 0.4 टक्के चार्ज लागू होणार आहे. ठोक विचार केल्यास 75 हजार किंवा त्यापेक्षा जास्तीच्या व्यवहारांवर 300 रुपये एवढं शुल्क द्यावं लागणार आहे. दरम्यान UPI पेमेंट सध्या प्रचंड चर्चेत आलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही एक किस्सा सध्या ट्रेंडमध्ये आला आहे. हा त्यांचा किस्सा 2024 सालचा आहे.
तर जानेवारी 2024मध्ये फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर आलेले. तेव्हा रोडशो सुरु होता. जयपूरमध्ये पीएम मोंदींनी त्यांना UPI पेमेंटबद्दल माहिती दिली होती. त्याचवेळी त्यांनी साहू या चहावाल्याच्या दुकानावर मसाला चहा प्यायला होता. तिथेच त्यांनी ऑनलाइन पेमेंटही केलं होतं. त्यावेळी मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना UPI आणि ऑनलाइन पेमेंटचं महत्त्व किती वाढणार आहे, याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्यासोबत जेवणासाठी गेल्यावर केलेल्या भाषणात मोदींच्या या घटनेचा उल्लेख केला होता. यासंदर्भातला एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
एवढंच नाही तर जयपूरमधील या दौऱ्यामध्ये पीएम मोदींनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांना गिफ्ट देण्यासाठी एका हस्तकला दुकानातून राम मंदिर प्रतिकृती खरेदी केली होती. यावेळी त्यांनी 500 रुपयांचे UPI पेमेंट केले होते. या रॅलीमध्ये मोदींनी दोन वेळा ऑनलाइन पेमेंट केलं होतं.
दरम्यान, आता केंद्र सरकार अलर्ड मोडवर गेलं आहे. नव्या नियमांनुसार UPI व्यवहारांवरील चार्ज सर्वसामान्यांवर पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. अनेकदा मर्चंटद्वारे ग्राहकाकडून चार्जसह बिल वसूल केलं जातं, तसं होऊ नये, त्यासाठी काय उपाययोजना करता येतील त्यासाठी त्यासाठी एक बैठक पार पडली आहे. ही बैठक पेमेंट कंपन्यांच्या अधिकाऱ्यासोबत झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यूपीआय पेमेंटद्वारे निर्माण झालेला विश्वास कमी न होऊ देण्यासाठी सरकार सतर्क झाले आहे.
