बुलेट ट्रेनचे स्वप्न आता दूर नाही, देशात केव्हा सुरु होणार बुलेट ट्रेन? रेल्वेमंत्र्यांनी सांगितली तारीख

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरु करण्याची पुन्हा एक नवीन डेडलाईन रेल्वे मंत्र्यानी सांगितली आहे. आता बुलेट ट्रेन पहिल्या टप्प्यात १०० किमी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याची तारखावार माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे.

बुलेट ट्रेनचे स्वप्न आता दूर नाही, देशात केव्हा सुरु होणार बुलेट ट्रेन? रेल्वेमंत्र्यांनी सांगितली तारीख
bullet train project
| Updated on: Jan 01, 2026 | 8:59 PM

आता मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन केवळ स्वप्न राहिलेले नाही. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुलेट ट्रेनच्या संचनलाबद्दल माहिती दिली आहे. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की भारताची पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ पासून सुरु होणार आहे. ही ट्रेन एकसाथ संपूर्ण मुंबई ते अहमदाबाद अशा ५०८ किमीच्या संपूर्ण पट्ट्यात सुरु न होता टप्प्या टप्प्याने होणार आहे. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद थेट बुलेट ट्रेन आणखी किती वर्षांचा काळ लागेल हे सांगणे कठीण आहे.

पहिल्या कोणत्या मार्गावर धावणार बुलेट ट्रेन ?

मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या संपूर्ण ५०८ किमी मार्गावर तिला सुरुवातीला चालवणे शक्य होणार नाही. कारण मुंबईतील बीकेसी हे भूयारी स्थानक तसेच समुद्राखालील बोगदा याचे काम संपण्यास खूप वर्षे लागण्याची शक्यता आहे.त्यामुळे बुलेट ट्रेन टप्प्या टप्प्याने चालवण्यात येणार आहे. याची सुरुवात खालील प्रकारे हळूहळू करण्यात येणार आहे.

सर्वात आधी सुरत ते बिलीमोरा या दरम्यान ट्रेन धावणार

– त्यानंतर वापी ते सुरत सेक्शन सुरु होईल

– नंतर वापी ते अहमदाबाद

– आणि अखेरीस मुंबई ते अहमदाबाद असा संपूर्ण मार्ग सुरु होईल.

– संपूर्णपणे सुरु झाल्यानंतर ही बुलेट ट्रेन अहमदाबाद, वडोदरा, भरूच, सूरत, वापी, ठाणे आणि मुंबई सारख्या शहरांना जोडली जाणार आहे.

किती वेग आणि किती वेळ लागणार ?

या बुलेट ट्रेनला ३२० किमी / प्रति तास या वेगाने धावण्यासाठी तयार करण्यात आले आहे. ट्रेनला जर केवळ ४ थांबे असतील तर ती मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास १ तास ५८ मिनिटात पूर्ण करेल. जर ट्रेन सर्व 12 स्थानकांवर थांबेल तर ती २ तास १७ मिनिटात हे अंतर कापले.

आधी योजना होती की बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा केवळ ५० किमीचा सुरु करायचा. परंतू आता त्यास वाढवण्यात आले आहे. ऑगस्ट २०२७ मध्ये पहिली बुलेट ट्रेन सुरत ते वापी या १०० किलोमीटर अंतरापर्यंत धावेल. म्हणजे उद्घाटीय धाव ही आधी पेक्षा जास्त अंतराची असेल.

येथे पोस्ट पाहा –

प्रोजेक्टला उशीर का झाला

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या बांधकामास सुरुवात २०१७ मध्ये झाली होती आणि आधी ही योजना साल २०२३ पर्यंत पूर्ण करण्याची होती. महाराष्ट्रातील रखडलेले जमीन अधिग्रहण आणि बांधकामात झालेला उशीर तसेच कोरोना काळातील बाधा यामुळे हा प्रकल्प प्रचंड रेंगाळला आहे. आता नवीन तारीख १५ ऑगस्ट २०२७ म्हटली जात आहे. रेल्वे मंत्रालयाच्या नुसार या प्रकल्पासाठी आतापर्यंत ८५,८०१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. या प्रकल्प जपानच्या मदतीने सुरु करण्यात आला आहे.