AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिचेल स्टार्कला लाज वाटेल असा स्विंग! प्लास्टिक बॉल गोलंदाजी पाहून आकाश चोप्राही झाला आश्चर्यचकीत

क्रिकेट हा लोकप्रिय खेळ असून गल्लीबोळात खेळला जातो. अनेक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील स्विंग पाहून आकाश चोप्राही आश्चर्यचकीत झाला.

मिचेल स्टार्कला लाज वाटेल असा स्विंग! प्लास्टिक बॉल गोलंदाजी पाहून आकाश चोप्राही झाला आश्चर्यचकीत
मिचेल स्टार्कला लाज वाटेल असा स्विंग! प्लास्टिक बॉल गोलंदाजी पाहून आकाश चोप्राही झाला आश्चर्यचकीतImage Credit source: video grab/PTI
| Updated on: Jan 01, 2026 | 10:21 PM
Share

सोशल मीडियावर आसपास घडणाऱ्या बारीकसारीक गोष्टीही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओने क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा यांनाही या व्हिडीओचं विश्लेषण करण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी आपल्या शैलीत या व्हिडीओचं विश्लेषण केलं आहे. एका ठिकाणी प्लास्टिक बॉलने क्रिकेट सामने खेळले जात असल्याचं दिसत आहे. यात एक गोलंदाज प्लास्टिक बॉल ज्या पद्धतीने स्विंग करत आहे ते पाहून आश्चर्याचा धक्का बसणं सहाजिकच आहे. या स्विंगला क्रिकेट जगतात बनाना स्विंग असं संबोधलं जातं. हा चेंडू हवेत इतका वळतो की शेवटच्या क्षणापर्यंत फलंदाजाला त्या चेंडूचा अचूक अंदाज घेणं कठीण होतं आणि क्लिन बोल्ड होतो. या गोलंदाजीवर आकाश चोप्राने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आकाश चोप्राने सोशल मिडिया हँडलवर व्हिडीओ शेअर करत त्याचं कौतुक केलं. त्याच्या मजेदार शैलीत क्रिकेटचं विश्लेषण करत सांगितलं की, त्याची गोलंदाजीचा स्विंग पाहून जगातील घातक गोलंदाज मिचेल स्टार्कही लाजेल. आकाश चोप्राच्या मते प्लास्टिक चेंडूने अशा पद्धतीने स्विंग करणं खरंच आश्चर्यकारक आहे. खरं तर अशा पद्धतीचा स्विंग बॉल खेळणं कोणत्याही गोलंदाजासाठी अशक्य आहे, असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. पण लेदर बॉलने इतका स्विंग करणं प्लास्टिक बॉलच्या तुलनेनं कठीण आहे. कारण प्लास्टिक आणि लेदर बॉलमध्ये फरक आहे. दोन्ही चेंडूंच्या वजनात फरक आहे.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

आकाश चोप्राने शेअर केलेल्या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांच्या मते प्लास्टिक चेंडूने अशा पद्धतीने स्विंग करणं शक्य आहे. कारण प्लास्टिक चेंडू हलका असतो आणि वाऱ्याच्या दबामुळे सहज दिशा बदलू शकतो. पण व्हिडीओतील गोलंदाजाचं स्विंग चेंडूवर चांगलं नियंत्रण असल्याचं दिसत आहे. कारण कसा होऊ शकतो याचा अंदाज गोलंदाजाला आहे. त्यामुळे गोलंदाज अचूक मारा करत आहे असं म्हंटलं तर चुकीचं ठरणार नाही. या व्हिडीओतून स्थानिक क्रिकेटमध्येही टॅलेंट असल्याचं दिसून आलं आहे. व्हिडीओच्या माध्यमातून हे टॅलेंट जगासमोर येत आहे.

अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट
अजित पवारांकडून गुंडाना उमेदवारी, खरातांचं नाव पुढं करून दादांची पळवाट.
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?
उद्धव ठाकरे शिवतीर्थवर, ठाकरे बंधूंचा वचननामा फायनल? कधी होणार जाहीर?.
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?
मनसेसोबत मोठा गेम? दोन उमेदवार अचानक गायब, नेमकी खेळी काय?.
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?
शिवसेना उमेदवारानं खरंच प्रतिस्पर्धीचा AB फॉर्म खाल्ला?.
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन
पुण्यात भाजप उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे ढसाढसा रडल्या अन.
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा
एका उमेदवारानं दुसऱ्या उमेदवाराचा AB फॉर्म खाल्ला, पुण्यात एकच चर्चा.
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन
जेजुरी येथे भंडारा उधळत नववर्षाचे स्वागत, भाविकांकडून खंडोबाचे दर्शन.
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?
मनसेचे 53 उमेदवार थेट राज ठाकरेंच्या भेटीला, पडद्यामागे घडतंय काय?.
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान
शिंदे सेनेला निवडणुकीपूर्वीच मोठा धक्का, 'स्थानिक' निवडणुकीत आव्हान.
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार
तितकी मिर्ची बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही, राणेंचा प्रहार.