AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक असतो? दररोज खाणाऱ्यांना सुद्धा नाही सांगता येणार

मटण म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, भारतामध्ये मटण मोठ्या प्रमाणात खाल्लं जातं. मात्र मटणाचा नेमका कोणता भाग हा सर्वाधिक पौष्टिक आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?

मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक असतो? दररोज खाणाऱ्यांना सुद्धा नाही सांगता येणार
Mutton Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 6:01 PM
Share

मटण म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, नॉनव्हेजमध्ये भारतात मटणाला सर्वाधिक पसंती आहे. मटणाचे विविध प्रकार देखील बाजारात उपलब्ध आहेत, जसं की तांबडा रस्सा, पांढरा रस्ता, मटण खिम्मा, अशा अनेक मटणाच्या डिश तुम्हाला हॉटेलमध्ये पहायला मिळतात. चिकन, अंडी यांच्या तुलनेत नॉनव्हेज प्रेमी खवय्यांची पहिली पसंत ही नेहमीच मटण असते. त्यात जर चुलीवरच्या बाजरीच्या भाकरी आणि मटण असा बेत जुळून आला तर मग पहायचं कामच नाही. अनेक जण मोठ्या आवडीने मटणावर ताव मारतात. भारतामध्ये अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत, जे दररोज किंवा आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन दिवस मटण खात असतील. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का? की मटणाचा सर्वात जास्त पौष्टिक भाग कोणता असतो?

मटण हे रेड मीटच्या श्रेणीमध्ये येतं. सर्वसाधारणपणे बोकडाच्या मांसाला मटण असं म्हटलं जातं. मटण हे शरीराला पौष्टिक असतं. मात्र भारतासारख्या देशात त्याचे भाव हे प्रचंड असल्यानं ते सर्वांनाच परवडत असं नाही. भारतामध्ये सध्या स्थितीत मटणाची किंमत प्रति किलो 600 ते 700 रुपये एवढी आहे. ज्या लोकांना मटण विकत घेणं परवडत नाही ते लोक शरीराच्या पोषणासाठी अंडी आणि चीकन देखील खातात. मात्र अंडी आणि चीकनच्या तुलनेत मटण हे जास्त पौष्टिक असतं.

मटणाचा कोणता भाग सर्वाधिक पौष्टिक?

एका संशोधनानुसार 100 ग्रॅम मटणामध्ये साधारणपणे 33 ग्रॅम प्रोटीन असते, यासोबतच त्यामध्ये व्हिटॅमिन बी 12, आर्यन आणि झिंक देखील मोठ्या प्रमाणात असते. जे व्यक्ती नियमितपणे मटण खातात त्यांना बी 12 व्हिटॅमिनची कमतरता जाणवत नाही. मटण म्हणजे खनिजांचा सर्वात उत्तम स्त्रोत असतो. तज्ज्ञांच्या मते बोकडाचे पुढचे पाय, शोल्डर, घसा, लिव्हर, बरगड्या आणि छाती हे भाग सर्वाधिक पौष्टिक असतात. मटण खरेदी करताना एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवावी, बोकड हे जास्त लहान किंवा खूप वृद्ध नसावे. तसेच त्याचे सरासरी वजन हे 8 ते 10 किलोच्या आसपास असावे अशा बोकडाचे मटण हे उत्तम तसेच पौष्टिक असते.

Follow Us
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....