
असं म्हणतात ज्याला नशीबाची साथ मिळते तो बसल्या बसल्या देखील करोडपती होऊ शकतो, या म्हणीचा प्रत्यय आता पुन्हा एकदा आला आहे. अमेरिका फिरण्यासाठी आलेला एक फ्रान्सचा पर्यटक करोडपती झाला आहे. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच ही कथा आहे. हा पर्यटक अमेरिकेमध्ये पर्यटनासाठी आला होता, त्याला अमेरिकेतला रॉकेट लॉन्च इव्हेंट पहायची इच्छा होती, त्यामुळे तो तिथे पोहोचला मात्र त्याचवेळी मोठा चमत्कार झाला आणि हा व्यक्ती करोडपती झाला आहे. तो अमेरिकेमधील एका छोट्याशा पार्कमध्ये फिरत असताना त्याला ठेच लागली, या घटनेनं या व्यक्तीचं अख्ख आयुष्यच बदलून गेलं आहे. या व्यक्तीच्या हाती मोठा खजाना लागला आहे. जेव्हा त्याला हा खजाना सापडला, तेव्हा घडलेल्या घटनेवर काही काळ या व्यक्तीला विश्वासच बसला नाही, दुपारच्या रणरणत्या उन्हात या व्यक्तीला खजाना सापडला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती या पार्कमध्ये फिरत असताना त्याला अचानक ठेच लागली जेव्हा त्याने खाली पाहिले तेव्हा त्याला तब्बल 7.46 कॅरेटचा हिरा सापडला, या हिऱ्यानं या व्यक्तीचं अख्ख नशीबच बदललं आहे. हा हिरा या व्यक्तीकडून खरेदीसाठी लोकांची रांग लागली आहे, खरेदीदारांनी हा हिरा विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपये देण्याची तयारी देखील दर्शवली आहे, हा व्यक्ती एका रात्रीमध्ये श्रीमंत झाला आहे. मात्र या व्यक्तीने आपल्याजवळचा हा हिरा विकण्यासाठी नकार दिला आहे.
जुलियन असं या व्यक्तीचं नाव आहे, तो पर्यटनासाठी अमेरिकेमध्ये आला होता. त्याला रॉकेट लॉन्च इव्हेंट पहायचा होता, त्याने तिथे भेट दिली, त्यानंतर तो अमेरिकेच्या एका पार्कमध्ये फिरत असताना त्याला ठेच लागली, ठेच लागल्यामुळे त्याने खाली पाहीले तर त्याला हा हिरा दिसला, तो एक क्षणात कोट्याधीश बनला आहे. अनेक लोकांनी त्याच्याकडे असलेला हा हिरा खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र त्याने हा हिरा विकण्यास नकार दिला आहे. या पार्कमध्ये अशाप्रकारचे काही रत्न सापडत असतात, यासाठी हे पार्क प्रसिद्ध आहे, लोक इथे हिऱ्याच्या शोधात येतात, मात्र हिऱ्याचा शोध न घेताही या व्यक्तीचं नशीब चमकलं आहे.