Who is Ajinkya Shinde : कोण आहेत अजिंक्य शिंदे ज्यांनी अभिजीत दीपकेंची जागा घेतली? दिल्लीच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार!

आम्हाला तिघांना पोलिसांनी अटक केली तर दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे हेच करतील. जोपर्यंत आम्ही बाहेर येत नाही, तोपर्यंत शिंदे हेच या आंदोलनाचे प्रमुख असतील, असे दीपके यांनी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले.

Who is Ajinkya Shinde : कोण आहेत अजिंक्य शिंदे ज्यांनी अभिजीत दीपकेंची जागा घेतली? दिल्लीच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार!
who is ajinkya shinde
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 2:28 PM

Who is Ajinkya Shinde : सध्या राजधानी दिल्लीमध्ये वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीतर्फे दिल्लीत आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी देशभराती हजारो लोक दिल्लीत जमा झाले आहेत. परंतु हे आंदोलन प्रत्यक्षात सुरू होण्याआधीच सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके तसेच आशुषोष रांका आणि सौरभ दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आंदोलनाच्या प्रमुख चेहऱ्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने हे आंदोलन होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु आता या आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे हे करणार आहेत. खुद्द अभिजीत दिपके यांनीच याबाबत माहिती दिलीय. त्यामुळे आता हे अजिंक्य शिंदे नेमके कोण आहेत? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

अजिंक्य शिंदे यांच्यावर आंदोलनाची जबाबदारी कशी आली?

अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास हे तिघेही विमानाने दिल्लीमध्ये आंदोलनसाठी जात होते. परंतु पोलिसांनी विमानातच या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर सीजेपीच्या सोशल मीडिया खात्यावर अभिजीत दीपके यांचा एक रेकॉर्डेड व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये आम्हाला तिघांना पोलिसांनी अटक केली तर दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्त्व अजिंक्य शिंदे हेच करतील. जोपर्यंत आम्ही बाहेर येत नाही, तोपर्यंत शिंदे हेच या आंदोलनाचे प्रमुख असतील, असे दीपके यांनी समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले. तसेच अजिंक्य यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Loading...

अजिंक्य शिंदे नेमके कोण आहेत?

दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे नेतृत्त्व आता अजिंक्य शिंदे करणार आहेत. अजिंक्य हे महाराष्ट्रातून येतात. ते सीजेपीच्या कार्यकारिणीत आहेत. ते संघटना प्रभारी आहेत. संघटनेचा विस्तार करणे, सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रात सीजेपीची टीम उभी करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. सीजेपीने ऑगस्ट 2026 मध्ये आपल्या कार्यकारिणीची घोषणा केली होती. यात दीपके यांना राष्ट्रीय संयोजक आणि अजिंक्य शिंदे यांना राष्ट्रीय संघटन प्रभारी करण्यात आले होते. दरम्यान आता अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीच्या आंदोलनाचे नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us