AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही बलात्कारी… अभिजीत दीपकेंच्या आईवडिलांची संतप्त प्रतिक्रिया; पाच शब्दातच सरकारला घेरलं

जंतरमंतर आंदोलनासाठी निघालेले कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांना दिल्लीत अटक झाली. त्यांच्या आई-वडिलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली, 'तुम्ही बलात्कारी लोकांना का नाही पकडत?' असा सवाल करत त्यांनी सरकारला घेरले. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींसह अनेक कार्यकर्त्यांनाही देशभर ताब्यात घेण्यात आले, ज्याने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

तुम्ही बलात्कारी... अभिजीत दीपकेंच्या आईवडिलांची संतप्त प्रतिक्रिया; पाच शब्दातच सरकारला घेरलं
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 10, 2026 | 12:57 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांना दिल्ली विमानतळावर विमानतच ताब्यात घेण्यात आलं आहे. जंतरमंतरवरील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन हाणून पाडण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे सीजेपी कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. दीपके यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा देशभरात निषेध होत आहे. दीपके केवळ आंदोलन करण्यासाठी जात होते. ते काही सराईत गुन्हेगार नाहीत. त्यांना सराईत गुन्हेगारासारखी वागणूक का दिली जात आहे? असा सवाल देशभरातून केला जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांच्या आईवडिलांनी अवघ्या पाच शब्दात सरकारवर हल्ला चढवला आहे.

अभिजीत दीपके यांचे वडील भगवानराव दीपके यांनी या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. अभिजीतला ज्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आलं आहे, त्याने असा कोणता गुन्हा केला आहे? दिल्ली पोलीस चुकीचं वागत आहे. ही हुकूमशाही आहे का? असा संतप्त सवाल भगवानराव दीपके यांनी केला आहे.

मी बोललेच होते तुम्हाला…

तर अभिजीत यांची आई अनिता दीपके यांनीही सरकारवर टीका केली आहे. सरकारने तरुण पोरांना ताब्यात घेतलं हे चुकीचं केलं आहे. अभिजीत आणि त्याचे सहकारी चांगलं काम करत आहेत. तुम्ही बलात्कारी लोकांना अटक करत नाही. देशासाठी काम करणाऱ्यांना अटक करता. माझं लेकरू देशासाठी काम करत आहे. हे सरकार माझ्या मुलाला अटक करेल. त्याच्या सहकाऱ्यांना अटक करेल हे मी तुम्हाला बोलले होते, असं अनिता दीपके म्हणाल्या.

अभिजीतच्या घराबाहेर पोलिसांचा गराडा

दरम्यान, अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील अभिजीत यांच्या घराबाहेरचा पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दीपकेंना ताब्यात घेताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दीपके यांच्या घराकडे धाव घेतली. सुरक्षेचा आढावा घेतला. दीपके यांच्या घराकडे येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे.

महात्मा गांधींचे पणतू ताब्यात

दरम्यान, केवळ दिल्लीतच नव्हे तर पोलिसांनी देशभरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना मुंबईतून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तुषार गांधी यांना सध्या अंधेरीच्या डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. जंतरमंतर येथील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तुषांर गांधी यांच्या हम भारत के लोग संघटनेचे कार्यकर्ते आज दुपारी 3.30 वाजता ऑगस्ट क्रांती मैदानात जमणार होते. त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?