
जयदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामे झाले आहे. यासाठी लवकरच निवडणूक होणार आहे. अशातच आता एनडीएकडून सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली आहे. आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही या बैठकीला हजर होते. बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी याबाबत घोषणा केली. सीपी राधाकृष्णन कोण आहेत ते जाणून घेऊयात.
सीपी राधाकृष्णन हे तामिळनाडूतील भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे पूर्ण नाव चंद्रपुरम पोनुस्वामी राधाकृष्णन आहे. राधाकृष्णन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1957 रोजी तामिळनाडूतील तिरुपूर येथे झाला. त्यांनी कोइम्बतूर येथील चिदंबरम कॉलेजमधून बीबीए केले आहे. राधाकृष्णन 1973 मध्ये वयाच्या 1 व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. कालांतराने ते जनसंघात सामील झाले आणि सक्रिय राजकारणात आले. ते सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.
सीपी राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचे सदस्यही आहेत. ते केरळचे प्रभारी देखील होते. 2016 ते 201 पर्यंत ते अखिल भारतीय कॉयर बोर्डाचे अध्यक्ष होते. 2004, 2012 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते कोइम्बतूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार होते. त्यांचा राजकीय प्रवास खालीलप्रमाणे…
दरम्यान, सी.पी. राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपचे प्रमुख नेते आहे. तामिळनाडू, केरळ आणि इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. आता ते उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनले आहेत.