मुंबईतल्या रियापेक्षाही व्हायरल झालेला जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान कोण? व्हिडिओ व्हायरल होताच…

जंतरमंतरवरच्या मोहम्मद इरफानचा व्हायरल व्हिडिओ लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकतो. NEET आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या दमनशाहीने व्यथित होऊन, इरफानने सरकारवर कडाडून टीका केली. संवादाऐवजी दंडुक्याचा वापर लोकशाहीला मारक असल्याचे त्याचे मत आहे.

मुंबईतल्या रियापेक्षाही व्हायरल झालेला जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान कोण? व्हिडिओ व्हायरल होताच...
Mohammad Irfan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2026 | 2:34 PM

सर, मी माझ्या झोपडीत सकाळी उठलो… फोन उघडला… सरकार हुकूमशाहीवर उतरल्याचं समजलं… अमानूषपणे पोरांना मारलं सर या सरकारने. ही लोकशाही नाहीये. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीत संवादाची आवश्यकता असते. दोन्हीकडून संवाद झाला पाहिजे. पण सरकारने मुलांना बेदम मारलं. एखादं सरकार असतं तर नारळपाणी घेऊन गेली असती, पण या सरकारने दंडुक्याने काम चालवलं… सर ही लोकशाही नाही… नाही… नाही… निश्चितच लोकशाही नाही… मोहम्मद इरफानचे हे शब्द तुमच्या अंतरआत्म्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीच्या झोपडपट्टीत राहणारा मोहम्मद, जंतरमंतरवरच्या हल्ल्याने व्यथित झालाय. मनाने जखमी झालाय. त्यामुळे तो आग ओकत होता. व्यवस्थेला सवाल करत होता. पोटतिडकीने मनातील भावना व्यक्त करत होता. बोलता बोलता त्याचे हात थरथरत होते. त्याचे शरीर कंपन पावत होते. त्याचे शब्द घणाचे घाव बनून टाळक्यात पडत होते. मोहम्मदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तुम्हीही हे व्हिडीओ पाहाल तर तुमच्या डोळ्यावरची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. अन् याच लोकांमुळे लोकशाही जिवंत आहे, याचा सार्थ अभिमान वाटल्याशिवायही राहणार नाही. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us