Prashant Kishor: ‘राज ठाकरे कौन है?’, प्रशांत किशोर यांची छटपूजेच्या वादावरून मनसे अध्यक्षांवर जहरी टीका, म्हणाले काय?

Prashant Kishor On Raj Thackeray: छठपूजेआडून सांस्कृतिक दडपशाहीवरून वाद उफाळला आहे. मनसे आणि उद्धव सेनेच्या विरोधानंतर आता बिहारच्या नेत्यांनी या वादात उडी घेतली आहे. प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Prashant Kishor: राज ठाकरे कौन है?, प्रशांत किशोर यांची छटपूजेच्या वादावरून मनसे अध्यक्षांवर जहरी टीका, म्हणाले काय?
'राज ठाकरे कौन है?', प्रशांत किशोर यांची मनसे अध्यक्षांवर जहरी टीका, म्हणाले काय?
| Updated on: Nov 15, 2026 | 6:33 AM

Prashant Kishor On Raj Thackeray: छठपूजेआडून मुंबईत सांस्कृतिक दडपशाही होत असल्याबाबत मनसे आणि उद्धव सेना नाराज आहे. मु्ंबई लोकल स्थानकांवर भल्या पहाटेपासून रेल्वेकडून भोजपूरी गाणी वाजवल्या जात असल्याने नाराजी आहे. सणाला विरोध नाही पण एकूणच प्रकाराला विरोध असल्याचे स्थानिक संघटनांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. दरम्यान या वादात आता बिहारच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

प्रशांत किशोर यांची राज ठाकरे यांच्यावर टीका

Loading...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जन सुराज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी टीका केली आहे. हा केवळ प्रसिद्धीचा प्रकार असल्याचा दावा त्यांनी केला. प्रादेशिकवाद वाढवण्याचे हे प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला. मनसे अध्यक्षांनी छठपूजेवरून भाजपवर निशाणा साधला होता. आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राजकीय फायदा उठवण्यासाठीच भाजप मुंबईत प्रादेशिकवाद आणि भाषिक वाद पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. भाजप सोशल मीडियावर काही रील्स प्रसारित करत आहे, ज्यात छठपूजेच्या विधींना सांस्कृतिक आक्रमण म्हणून दाखवले जात आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी संगीत वाजवण्याचा मुद्दाम प्रयत्न होत असल्याकडेही राज ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

बिहार येथील बांकीपूरचे आमदार प्रशांत किशोर यांनी राज ठाकरे यांच्यावर याप्रकरणी टीका केली. जेव्हा त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही, तेव्हा ते उत्तर प्रदेश आणि बिहार येथील लोकांवर टिप्पणी करतात. मीडियात प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. येणकेण प्रकारे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, अशी टीका किशोर यांनी केली.

चिराग पासवान यांचीही टीका

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सुद्धा मनसे अध्यक्षांवर टीका केली. मनसे सातत्याने प्रादेशिकवाद पसरवत असल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईच्या अर्थव्यवस्थेत बिहार आणि उत्तर प्रदेशातील लोकांचा मोठा वाटा असल्याचा दावा त्यांनी केला. मजूर, व्यावसायिक आणि उद्योजकांचा मुंबई घडवण्यात मोठा सहभाग असल्याचे पासवान म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच उत्तर भारतीयांचा अपमान केला नाही आणि त्यांनी कधी प्रादेशिकवादालाही महत्त्व दिले नाही असे पासवान म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us