Revati Sule Reception: रिसेप्शन रेवतीचं पण चर्चा ‘स्मृती शिंदे’ची, कोण आहेत त्या, ज्यांना राहुल गांधी स्वत: गेले भेटायला…video viral
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनला अनेक लोकांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात एका गोष्टीने विशेष लक्षवेधून घेतेले. या कार्यक्रमात राहुल गांधी हे स्वत: पुढे येत एका व्यक्तीला भेटतात आणि तिच्यासोबत फोटोही काढतात. याचाव्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही काळापासून शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनल्या आहेत. सोमवारी हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र दिसले, पण यावेळी प्रसंग राजकीय नसून कौटुंबिक होता. पंतप्रधान मोदींनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या रिसेप्शनला हजेरी लावली, जिथे ते शरद पवार यांच्यासोबत बसून गप्पा मारताना दिसले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला अमित शाह यांच्यापासून ते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यासह अनेक प्रमुख राजकीय व्यक्तींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात एका गोष्टीने विशेष लक्षवेधून घेतेले. या कार्यक्रमात राहुल गांधी हे स्वत: पुढे येत एका व्यक्तीला भेटतात आणि तिच्यासोबत फोटोही काढतात. याचाव्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे हिच्या रिसेप्शनचे आयोजन सोमवारी राजधानी दिल्लीत करण्यात आले होते. या कार्यक्रमात राहुल गांधी आणि संपूर्ण गांधी कुंटुब रेवती सुळे आणि सारंग लखानी सोबत फोटोशूट करत होते. हे फोटोशूटनंतर लगेचच सुप्रिया सुळे यांनी राहुल गांधीना हाताला धरुन एका व्यक्तीजवळ आणले. ती व्यक्ती म्हणजे स्मृती शिंदे या आहेत. सुप्रिया सुळे या राहुल गांधीना स्मृती शिंदे यांच्या जवळ नेतात आणि सांगतात ही स्मृती शिंदे आहे. तुमची खूप मोठी फॅन आहे. या नंतर राहुल गांधी स्मृती यांच्यासोबत फोटो काढतात. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
स्मृती शिंदे कोण?
स्मृती शिंदे या माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या मुलगी आहेत. त्यांचे वय हे 54 आहे. त्यांनी बिझनेसमॅन संजय पहाडियासोबत लग्न केले होते. हा विवाहसोहळा 5 मार्च 1993 ला झाला होता. त्यांना दोन जुळी मुले आहेत. वीर पहाडिया आणि शिखर पहाडिया. वीर पहाडिया हा सध्या बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. तर शिखर हा हे एक उद्योजक आहे. स्मृती आणि संजय हे 2005 पासून वेगळे राहत असून अधिकृतपणे त्यांनी अजून घटस्फोट घेतलेला नाही. शिखर हा बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला डेट करतोय आणि ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. यामुळे स्मृती या लवकरच बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या सासू बनणार आहेत.स्मृती शिंदे या सोबो फिल्मच्या प्रॉड्युसर आणि फाउंडर आहेत.