WITT: सर्वोत्तम पंतप्रधान कोण? वाजपेयी की मोदी, नितीन गडकरींनी दिलं उत्तर

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते, यावेळी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

WITT: सर्वोत्तम पंतप्रधान कोण? वाजपेयी की मोदी, नितीन गडकरींनी दिलं उत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 30, 2025 | 7:34 PM

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमामध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी देखील सहभागी झाले आहेत. अटल बिहारी वाजपेयी की नरेंद्र मोदी दोन्हींपैकी सर्वोत्तम पंतप्रधान कोण असा प्रश्न यावेळी नितीन गडकरी यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर बोलताना नितीन गडकरी यांनी म्हटलं की, मला अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत काम करण्याची खूप कमी संधी मिळाली. नंबर एक वर अटल बिहारी वाजपेयी हे आहेत, तर नंबर दोनवर सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

त्यानंतर त्यांना असा देखील प्रश्न विचारण्यात आला की, नंबर तीनला कोणते पंतप्रधान आहेत? मनमोहन सिंह, इंदिरा गांधी की पंडित जवाहर लाल नेहरू? तेव्हा गडकरी यांनी स्मित हास्य करत म्हटलं की याला आता नंबर दोन पर्यंतच राहु द्या. दरम्यान हिंदूहृदय सम्राट कोण आहेत? असा प्रश्नही त्यांना यावेळी विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे, लाल कृष्ण आडवाणी आणि अशोक सिंघल या तिघांचं देखील नाव घेतलं.

गडकरींची आवडती अभिनेत्री कोण?

तुमची आवडती अभिनेत्री कोण असा प्रश्नही यावेळी नितीन गडकरी यांना विचारण्यात आला, यावर बोलताना ते म्हणाले की, तसं पाहिलं तर सर्वच अभिनेत्री चांगलं काम करतात. मात्र मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो, तेव्हा रजनीगंधा नावाचा एक चित्रपट आला होता, ज्यामध्ये विद्या सिन्हाने भूमिका केली होती, तिची ती भूमिका मला खूप आवडली होती, असं गडकरी यांनी म्हटलं आहे. रेखा आणि हेमा मालिनी या देखील चांगल्या अभिनेत्री आहेत, असंही गडकरी यांनी यावेळी म्हटलं. तसेच त्यांनी अभिनेत्री कंगणा रनौतच्या अभिनयाचं देखील कौतुक केलं. आपण पुढच्या आठवड्यात टोल संदर्भात मोठी घोषणा करणार आहोत, असंही यावेळी गडकरी म्हणाले आहेत.