Most costly Lawyers : देशातील सर्वात महागडे वकील कोण ? एका सुनावणीसाठी किती फी घेतात ?

भारतात अनेक मोठे विद्वान वकील आणि कायद्याचे पंडीत आहेत. आज आपण भारतातील काही महागड्या वकीलांच्या संदर्भात माहिती घेणार आहोत.

Most costly Lawyers : देशातील सर्वात महागडे वकील कोण ? एका सुनावणीसाठी किती फी घेतात ?
| Updated on: Oct 21, 2025 | 9:47 PM

Most costly Lawyers : भारतात अनेक मोठे निष्णात वकील आहेत. या वकीलांद्वारे कोर्टातील सुनावणीत मांडलेल्या युक्तीवादाने इतिहासाची दिशा बदलू शकते. ते केवल त्यांची बुद्धीमत्ता आणि कायद्याचे तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध नाही.तर त्यांच्या एका सुनावणीसाठी केवळ उभे राहाण्याची फि पाहून तुम्हाला धक्का बसू शकतो. चला तर भारतातील सर्वात महागडे वकील कोण आहेत आणि ते एका सुनावणीचे किती पैसे आकारतात हे पाहूयात…

हरीश साळवे

भारतातील आजच्या घडीचे सर्वात प्रसिद्ध वकीलांपैकी एक असलेले हरीश साळवे यांना नेहमीच देशातील सर्वात महागडे वकील म्हणून ओळखले जात आले आहे. हरीश साळवे यांनी भारताच्या काही सर्वात महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि घरगुती प्रकरणात प्रतिनिधीत्व केलेले आहे. मग ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात गुप्तहेर कुलभूषण जाधव यांची बाजू मांडणे असो वा किंवा सबरीमाला मंदिराचे प्रकरण हरीश साळवे यांनी या केसमध्ये बाजू लावून धरली आहे. हरीश साळवे यांची एका सुनावणीची फि १० लाख रुपये ते २५ लाख किंवा त्याहून अधिक आहे.

इतर प्रमुख महागडे वकील

या महागड्या वकीलांच्या यादीत आणखी एक नाव पुढे येते ते म्हणजे फली एस.नरीमन यांचे. नरीमन त्यांच्या प्रत्येक केससाठी ८ ते १५ लाख रुपयांची फी आकारतात असे म्हटले जाते. त्याच बरोबर या यादीत वकील अभिषेक मनु सिंघवली यांचे नाव देखील आहे. त्यांच्या नावावर अनेक मोठ्या राजकीय प्रकरणांची जंत्री आहे. अलिकडेच त्यांनी दिल्लीचे तत्कालिन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केस घेतली होती आणि त्यांना जामीनही मिळवून दिला होता. त्यांची फि देखील सर्वसाधारणपणे १५ लाख ते ३० लाख रुपयांच्या दरम्यान आहे.

या यादीत आणखी एक चर्चित नाव आहे ते म्हणजे मुकुल रोहतगी यांचे. २०२१ मध्ये अंमलीपदार्थ प्रकरणात त्यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याची केस लढविली होती. त्यांनी या केसमधून आर्यन खान याला यशस्वीपणे जामीन मिळवून दिला. मुकुल रोहतगी दर केसचे १० लाख रुपये ते २० लाख रुपयांपर्यंत फि आकारतात.

देशातील मोठे वकील

देशातील दिग्गज वकीलांद्वारे घेतली जाणारी भरभक्कम रक्कम ही केवळ त्यांचे वकीली ज्ञान आणि बुद्धीमत्ता दर्शवते तर त्यांचे अपार मुल्य देखील दर्शवते.कायद्याच्या कचाट्यात आणि संकटात सापडलेले लोक नेहमी त्यांची प्रतिष्ठा, उद्योग किंवा राजकीय भवितव्य अडचणी आल्यावर अशा वकीलांच्याकडे जातात. अशा वकीलांची फि प्रचंड असली तरी त्यांच्या युक्तीवादामुळे अशा लोकांना न्याय मिळतो तेही तितकेच महत्वाचे असते.