AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिमंत बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री?; आज फैसला

भाजपने आसाममधील सत्ता राखली असली तरी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची यावर अजूनही एकमत झालेलं दिसत नाही. (Who will be next Assam CM?; suspense over next CM continues)

हिमंत बिस्व सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री?; आज फैसला
Sarbananda Sonowal- Himanta Biswa Sarma
| Updated on: May 09, 2021 | 1:55 PM
Share

गुवाहाटी: भाजपने आसाममधील सत्ता राखली असली तरी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालायची यावर अजूनही एकमत झालेलं दिसत नाही. काल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही आसामच्या नेतृत्वाचा तिढा सुटलेला नाही. मात्र, हिमंत बिस्वा सरमा हेच आसामचे नवे मुख्यमंत्री असल्याचं सांगितलं जात आहे. आज भाजपच्या विधीमंडळ दलाची बैठक होत असून त्यात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Who will be next Assam CM?; suspense over next CM continues)

राजधानी दिल्लीत काल शनिवारी आसामच्या मुख्यमंत्रीपदावरून माथापच्ची झाली. मात्र त्यात काही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज दिसपूर येथे सकाळी 11 वाजता पक्षाच्या विधीमंडळ दलाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत आसामच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यपालांकडे दावा करणार

आज दुपारी 4 वाजता भाजपचे नेते राज्यपाल जगदीश मुखी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा करतील. आज होणाऱ्या बैठकीत हिंमत बिस्वा सरमा यांना विधीमंडळ दलाचे नेते म्हणून निवडण्यात येईल. त्यानंतर राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केला जाणार आहे.

दोन्ही नेते चार्टड प्लेनने दिल्लीत

आसाममध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व अॅक्शन मोडमध्ये आले आहे. त्यामुळेच जेपी नड्डा यांनी काल मुख्यमंत्री सोनोवाल आणि हिमंत बिस्वा सरमा यांना तातडीने दिल्लीत बोलावलं होतं. त्यानंतर दोन्ही नेते चार्टड प्लेनने दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी दिवसभर वरिष्ठ नेत्यांची खलबते झाली. त्यात हिमंत बिस्वा सरमा यांना झुकते माप देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. मात्र, सोनोवाल यांनीही मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याने स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या बैठकीत सहभागी व्हावं लागल्याचं सांगण्यात येतं.

काँग्रेसमधून भाजपात

2016मध्ये हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपने सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली असून भाजप त्यातून मार्ग कसा काढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Who will be next Assam CM?; suspense over next CM continues)

संबंधित बातम्या:

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद आणि हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलावलं; आज फैसला

नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या; शिवसेनेचा गडकरींना फुल्ल पाठिंबा

धक्कादायक! कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

(Who will be next Assam CM?; suspense over next CM continues)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.