
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु आहे. विरोधीपक्षनेते राहुल गांधींनी, ‘भारताला कोणत्याही देशाने पाठिंबा दिला नाही. पहलगाम नंतर एकाही देशाने पाकिस्तानचा निषेध नोंदवला नाही. फक्त दहशतवाद्याचा निषेध नोंदवाला. याचा अर्थ जग पाकिस्तानच्या बाजूने आहे असं विधान केले आहे. याला आता पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना सांगितले की, 22 एप्रिल रोजी मी सार्वजनिक रुपाने आणि इंग्रजीतही बोललो होतो. आमचा संकल्प आहे की, आम्ही दहशतवाद्यांना नेस्तनाबूत करू. मी सार्वजनिकरित्या सांगितलं होतं की त्यांच्या आकांनाही शिक्षा करू. कल्पनाच्या पलिकडची मोठी शिक्षा मिळेल. 22 एप्रिल रोजी मी परदेशात होतो. मी लगेच आलो. आल्यावर मी लगेच मी एक बैठक बोलावली. आणि त्या बैठकीत मी स्पष्टपणे निर्देश दिले, की दहशतवादाला करारा जवाब दिला पाहिजे. हा आपला राष्ट्रीय संकल्प आहे.
आम्हाला आपल्या सैन्य दलाच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. पूर्ण भरोसा आहे. त्यांचं साहस सामर्थ्यावर. सैन्याला कारवाईची खुलं स्वातंत्र दिलं गेलं. सैन्याने ठरवावं कधी, कुठे कशाप्रकारे या सर्व गोष्टी त्या मिटिंगमध्ये सांगितल्या. त्या मीडियातही आल्या. दहशतवाद्यांना अशी शिक्षा दिली, शिक्षा अशी आहे की आजही दहशतवाद्यांच्या आकांची झोप उडाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.
राहुल गांधींना उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले की, जगातील कोणत्याही देशाने भारताला कारवाई करण्यापासून रोखलं नाही. संयुक्त राष्ट्र, 193 देशात फक्त तीनच देश ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानच्या बाजूने बोलले होते. ग्रीस, फ्रान्स, जर्मनी कोणत्याही देशाचं नाव घ्या, संपूर्ण जगाने भारताला समर्थन दिलं आहे. जगाचं समर्थन मिळालं.
जगातील देशांचं समर्थन मिळालं, पण दुर्भाग्य म्हणजे माझ्या देशातील विरांच्या पराक्रमाला काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही. 22 एप्रिल नंतर तीन चार दिवसातच हे उड्या मारत होते. कुठे गेली 56 इंचाची छाती, कुठे हरवले मोदी, मोदी तर फेल गेले… काय मजा घेत होते. त्यांना वाटत होतं की वाह बाजी मारली. त्यांना पहलगामच्या निर्दोष लोकांच्या हत्येतही राजकारण पाहत होते.