सिमेवर असलेल्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण माहिती झालं तर तुम्ही देखील लावाल

तुम्ही काही ठिकाणी पाहिलं असेल की भारतीय सीमेवर जवान ताराच्या कुंपणाला रिकाम्या काचेच्या बाटम्या अडकवतात, मात्र त्यामागे नेमकं कारण काय आहे? याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?

सिमेवर असलेल्या तारांच्या कुंपणाला जवान रिकाम्या काचेच्या बाटल्या का अडकवतात? खरं कारण माहिती झालं तर तुम्ही देखील लावाल
Indian Border
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 04, 2026 | 7:14 PM

भारताच्या सीमा या अनेक ठिकाणी घनदाट जंगलं, डोंगराळ प्रदेश आणि दुर्गम भागांमधून जातात, अशा ठिकाणी सीमांच्या तारांना सेंसर किंवा हायटेक कॅमेरे लावणं शक्य होत नाही, मग अशा ठिकाणी सीमेची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षा दल एक साधा परंतु अतिशय परिणामकारक उपाय करतात. सीमाच्या कुंपणासाठी ज्या तारा लावण्यात येतात त्या तारांना काचेच्या रिकाम्या बाटल्या अडकल्या जातात, पण असं का केलं जातं? त्या मागचा नेमका उद्देश काय? आणि या रिकाच्या काचेच्या बाटल्यांमुळे सिमेचं संरक्षण कसं होतं? याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

जेव्हा एखादा व्यक्ती, घुसखोर किंवा जंगली प्राणी या सीमेवर लावलेल्या तारांना स्पर्श करतो किंवा सीमेमधून आत घुसण्याचा प्रयत्न करतो तेव्हा, त्या तारेला अडकवलेल्या काचेच्या बाटल्या या एकमेकांना धडकतात, त्या बाटल्या काचेच्या असल्यामुळे त्यातून मोठा आवाज येतो. रात्रीच्यावेळी अशा भागांमध्ये प्रचंड शातंता असते, त्यामुळे त्याचा आवाज हा दूरपर्यंत जातो. हा आवाज सीमावर्ती भागांमध्ये तैनात असलेल्या जवानांना सतर्क करतो, आणि त्यांना कोणीतरी सीमा पार करण्याचा प्रयत्न करत आहे, याची जाणीव होते. अनेक ठिकाणी सीमा या दुर्गम भागात तसेच घनदाट जंगलामध्ये असल्यामुळे तिथे विजेची सोय नसते, त्यामुळे अशा ठिकाणी या काचेच्या रिकाम्या बाटल्यांमुळे जावानांचं काम सोप होतं.

भारताच्या सीमा ज्या भागांमध्ये आहेत, तिथे अनेकदा एक तर तापमान हे मायनस शून्याच्याही खाली असतं, किंवा काही भागात अति उष्णता असते, त्यामुळे अशा ठिकाणी तारेला लावलेले सेंसर योग्य पद्धतीने काम करत नाहीत, किंवा ते खराब होतात. मात्र काचेल्या बाटल्या या विजेशिवाय तसेच कोणत्याही सेंसरशिवाय आपलं काम योग्य पद्धतीने करतात, तसेच कोणी जर सीमेच्या आत घुसण्याचा प्रयत्न केला तर या बाटल्या एकमेकांवर आदळतात, त्याच्या आवाजामुळे जवान सतर्क होतात, या काचेच्या बाटल्यांना कोणत्याही नेटकर्वकची देखील गरज नसते. त्यामुळे ज्या भागांमध्ये हायटेक सुरक्षा लावणं शक्यत नसतं, अशा भागांमध्ये याच बाटल्या महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणून भारताच्या सीमेवर लावण्यात आलेल्या ताराच्या कुंपणावर या काचेच्या रिकाम्या बाटल्या अडकवल्या जातात.