
अनेकदा असं होतं की, आपण अनेक गोष्टी नियमितपणे वापरत असतो, मात्र त्या वस्तू संदर्भात अशा काही गोष्टी असतात ज्याची आपल्याला माहिती नसते, उदहारण द्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सीमकार्डचा वापर वर्षानुवर्ष करत आला आहात, करत आहात. मात्र 99 टक्के लोकांना हे माहीत नाही की सीमकार्डचा एक कोपरा कट का केलेला असतो? नेमकं त्या मागे काय कारण आहे? हा असा प्रश्न आहे, अनेक लोकांना याचं उत्तर जाणून घ्यायचं आहे. जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल तर आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
म्हणून एक कोपरा कट करतात
सीमकार्ड ही एक अशी वस्तू आहे, जिचा वापर लाखो लोक आपल्या मोबाईलमध्ये करतात, सीमशिवाय कोणताही मोबाईल चालूच शकत नाही, जर मोबाईलमध्ये सीम नसेल तर तुम्ही कोणाशीही संवाद साधू शकणार नाहीत. तज्ज्ञांच्या मते सीमला या प्रकारे जिझाइन करण्यात आलं आहे, त्यामागे एक खास कारण आहे. फोनमध्ये सीम योग्य प्रकारे फीट व्हाव हा त्या मागचा उद्देश आहे. त्यामुळेच सीमकार्डचा एक कोपरा कट केलेला असतो. सीमकार्डचा एक कोपरा कट केल्यामुळे हे लोकांच्या लवकर लक्षात येत की कार्ड कोणत्या दिशेनं बसवायचं आहे,अशी माहिती टेक्नोलॉजी एक्सपर्ट्संनी दिली आहे. सीमकार्डचा एक कोपरा कट केलेला असतो, त्यामागे हाच उद्देश असतो की, त्यामुळे लोकांना सहज समजतं सीमकार्ड सोइचं आहे की, उलट? जर तुम्ही मोबाईलमध्ये उलट सीम फीट केलं तर तुमचा मोबाईल प्रॉपर वर्क करणार नाही. तसेच त्यामुळे तुमचं सीमकार्ड देखील खराब होऊ शकतं.
सीमकार्ड कसं काम करतं?
सीमकार्डचं पूर्ण नाव सब्सक्राइब आयडेंटिटी मॉड्यूल असं आहे, हे सीमकार्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल डिव्हायसच्या सेल्युलर नेटवर्कला कनेक्ट करावं लागतं. या सीममध्ये इंटरनॅशनल मोबाईल सब्सक्रायबर आयडेंटिटी (IMSI) नंबर आणि त्याच्याशी संबंधित Keys स्टोअर असतात, त्यामुळे तुमचं सीम चालू झाल्यानंतर तुमचा मोबाईल प्रॉपर वर्क करतो, सीमच्या मदतीनं तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याला फोन करू शकता.