दह्यावरून दक्षिणेत का पेटले भाषायुद्ध , तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली ही मागणी

दक्षिण भारतातील राज्ये स्वत:च्या भाषीय अस्मितेबाबत कायम संवेदनशील राहीली आहेत. तामिळनाडूत हिंदी भाषेला विरोध होत राहीला आहे. दही शब्दाच्या वापराबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात येताच डीएमकेचे नेते मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी लगेच त्याचा वापर केला आहे.

दह्यावरून दक्षिणेत का पेटले भाषायुद्ध , तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केली ही मागणी
DAHI (1)Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Mar 30, 2023 | 12:55 PM

नवी दिल्ली : दक्षिण भारतात सध्या दही शब्दावरून भाषा युद्ध पेटले आहे. देशभरातील फूड सेफ्टीवर लक्ष ठेवणाऱ्या आरोग्य मंत्रायलयाच्या भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या ( FSSAI ) एका आदेशाने दक्षिण भारतात राजकारण चांगलेच तापले आहे. वास्तविक FSSAI या संस्थेने दह्यांच्या पाकिटावर हिंदीत ‘दही’ असा शब्द प्रसिद्ध करण्याचे आदेश दिल्याने भाषेच्या अस्मितेबाबत नेहमीच दक्ष आणि जागरूक असणारे दक्षिण भारतीय भडकले आहेत. आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी या मुद्द्यावरून केंद्राला हिंदी भाषा लादण्यावरून खडे बोल सुनावले आहेत.

कन्नड भाषेत ‘दही’ ला ‘मोसारू’ आणि तामिळमध्ये ‘तयैर’ म्हटले जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये आतापर्यंत दह्यांच्या पाकिटावर हीच स्थानिक भाषेतील नावे प्रसिद्ध केली जात होती. परंतू आता FSSAI या केंद्रीय संस्थेने अलिकडील आपल्या आदेशात या राज्यातील मिल्क फेडरेशन आणि स्थानिक दूध आणि दही निर्मिती संस्थांना पाकिटावर हिंदी भाषेत ‘दही’ असे हिंदीत छापावे असे आदेश जारी केले आहेत. FSSAI ने दिलेल्या या आदेशात हिंदी दही शब्दानंतर स्थानिक नाव कंसात लिहू शकता असे म्हटले आहे.

मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन भडकले

FSSAI ने काढलेल्या या आदेशाविरोधात मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन चांगलेच भडकले आहेत. आमच्यावर हिंदी भाषा लादण्याचा हा प्रयत्न आहे. पाकिटावर हिंदी भाषा छापण्याच्या या कृतीतून केंद्राचे इरादे स्पष्ट झाले आहेत. आमच्या राज्यात तामिळ आणि कन्नड भाषेला दुय्यम स्थान देण्याचा हा प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले आहे. आमच्या भाषेचा जर कोणी अपमान करीत असेल तर त्यांना दक्षिणेतून कायमचे पळवून लावले जाईल असा इशाराही स्टॅलिन यांनी दिला आहे.

तर तुम्ही येथून कायमचे हद्दपार व्हाल

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटले आहे की FSSAI आम्हाला आमच्या मातृभाषेला दूर करायला सांगत आहे. आपल्या मातृभाषेची रक्षा करणाऱ्यांनी आमची बाजू आधी ऐकायला हवी आहे. तुम्ही आधी लोकांच्या भावनेचा आदर करायला शिकायला हवे, तुम्ही आधी बाळाला चिमटा काढून नंतर पाळणा हलविण्याचा प्रयत्न करू नका, पाळणा हलविण्याच्या आधीच तुम्ही येथून कायमचे हद्दपार व्हाल असे म्हटले आहे. केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक दूध उत्पादक संघांनी दह्याच्या पाकिटांवर स्थानिक भाषेचा वापर करण्याची मागणी केल्यानंतर दह्यावर लेबल लावण्याबाबतचे निर्देश केंद्रीय संस्थेने दिले आहेत. तामिळनाडू को ऑपरेटीव्ह मिल्क प्रोड्यूसर्स फेडरेशनला FSSAI ने दही हा हिंदी शब्द छापल्यानंतर तामिळ भाषेत ‘tair’ या  ‘tayir’ असे कंसात लिहू शकता असे म्हटले आहे.

तामिळनाडूचा नकार

तामिळनाडूने FSSAI च्या या आदेशाला मानण्यास स्पष्ठ शब्दात नकार कळविला आहे. तामिळनाडूचे डेअरी मिनिस्टर म्हटले आहे की राज्यात FSSAI चा निर्देश लागू शकत नाही, त्यांनी दही कपावर पूर्वी प्रमाणेच तयैर असे लिहीले जाईल असे म्हटले आहे. तामिळनाडूत स्थानिक भाषेचा मुद्दा इतका संवेदनशील आहे की भाजपाच्या तामिळनाडूतील नेत्यांनीही स्टॅलिन यांना पाठींबा दिला आहे. तामिळनाडू बीजेपी अध्यक्ष अण्णामलाई यांनी चे चेअरमन राजेश भूषण यांना पत्र लिहून या नोटीफिकेशनला रद्द करण्याची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.