AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताची ‘ही’ एक गोष्ट अमेरिकेला खटकली, त्यामुळेच ट्रम्प यांनी लावला 25 टक्के कर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर 25 टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. आता अमेरिकेने भारतावर कर लादण्याचे खरे कारणही समोर आले आहे.

भारताची 'ही' एक गोष्ट अमेरिकेला खटकली, त्यामुळेच ट्रम्प यांनी लावला 25 टक्के कर
trump
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 30, 2025 | 11:04 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर 25 टक्के कर लावला असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारताला याचा आर्थिक फटका बसणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेतील संबंध तितकेसे चांगले नाहीत असंही विधान केलं आहे. आता अमेरिकेने कर लावल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेने भारतावर कर लादण्याचे खरे कारणही समोर आले आहे.

काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात या कराबाबत करार होण्याची शक्यता होती, मात्र करार होऊ न शकल्याने अमेरिकेने कर लादल्याची घोषणा केली आहे. आता भारत सरकारनेही शेतकरी, लघु उद्योजक आणि एमएसएमई क्षेत्राच्या हितांचे रक्षण करण्यासाठी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं असं म्हटलं आहे. तसेच आगामी काळात योग्य ते पाऊल उचलले जाईल असंही सरकारने स्पष्ट केलं आहे.

25 टक्के कर लावण्याचे कारण आले समोर

अशातच आता अमेरिकेने भारतावर जास्त कर लादण्याचे खरे कारण समोर आले आहे. भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध वाढले आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या अमेरिकेने भारतावर मोठा कर लादला असल्याचे समोर आले आहे. कारण भारत रशियाकडून कमी भावात कच्चे तेल खरेदी करत आहे. भारताचा हा निर्णय अमेरिकेला पटलेला नाही. अमेरिकेने याआधी रशियाकडून तेल न खरेदी करण्यासाठी भारतावर दबाव टाकला होता, मात्र भारताने तेल खरेदी करणे सुरुच ठेवले होते. याची शिक्षा भारताला देताना अनेरिकेने हा कर लादला आहे.

भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला फायदा होत असल्याचे अमेरिकेने म्हटले होते. त्यामुळे अमेरिकेने भारतासह इतर काही देशांना तेल खरेदी न करण्याचा इशारा दिला होता. तसेच जर या देशांनी तेल खरेदी करणे सुरु ठेवले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असंही अमेरिकेने म्हटलं होतं. त्यामुळेच ट्रम्प यांनी भारतावर 25% कर लादला आहे.

शेअर बाजारावर परिणाम होणार

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे शेअर बाजारात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. याचा फटका गुंतवणूकदारांना बसण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस बाजारात चांगली तेजी दिसून आली होती, मात्र आता उद्या शेअर बाजार उघडताच तो कोसळण्याची शक्यता आहे.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था