विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला का केला? राहुल गांधींचा सवाल

नीट पेपरफुटी प्रकरणात विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, या मोर्चात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून आता राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.

विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला का केला? राहुल गांधींचा सवाल
rahul gandhi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 3:44 PM

मोठी बातमी समोर येत आहे. सोमवारी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणात संसदेवर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, या घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले होते, दरम्यान या आंदोलनात विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत होता. आज या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत या आंदोलनात सहभागी झालेला एक तरुण देखील होता, या तरुणावर पॅलेट गनने हल्ला झाल्याचा दावा करण्यात आला आहे, यावरून आता राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गनने हला का करण्यात आला? असा सवाल केंद्र सरकारला केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर पुन्हा एकदा नीट पेपरफुटी प्रकरणावरून निशाणा साधला आहे. धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षणमंत्री आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी राहुल गांधी यांनी केली आहे. नीट पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा काढला होता, यावेळी विद्यार्थी आणि पोलीस आमने-सामने आले, पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, यावरून देखील राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधींचं आंदोलन 

दरम्यान कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देत राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जोरदार आंदोलन केलं होतं. तब्बल तीन तास राहुल गांधी यांनी पंंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तीन तासांनंतर त्यांची सुटका करण्यात आली. यानंतर आता काँग्रेसने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणावरून सातत्याने काँग्रेकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत, तसेच अनेक ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आलं आहे.

 

 

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us