महामारीचं भयान वास्तव, ऑक्सिजन बेड मिळेना, पत्नीकडून रिक्षात पतीला तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न, आख्खा देश हळहळला

आगऱ्यात ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने 47 वर्षीय रवी सिंघल यांचं निधन झालं आहे (Wife breaths gave to husband through her mouth for save life in Agra).

महामारीचं भयान वास्तव, ऑक्सिजन बेड मिळेना, पत्नीकडून रिक्षात पतीला तोंडातून ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न, आख्खा देश हळहळला
रवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले
Follow us
| Updated on: Apr 24, 2021 | 7:43 PM

लखनऊ : संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) या भयानक संकटाला तोंड देत आहे. देशात दररोज लाखा पेक्षाही जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन बेड मिळणं कठीण होऊन बसलं आहे. महाराष्ट्र पाठोपाठ उत्तर प्रदेश, राजधानी दिल्लीतही भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयांबाहेर अनेक रुग्ण ताटकळत उपचारासाठी वाट बघत आहेत. पण त्यांच्यापर्यंत डॉक्टर वेळेवर पोहोचू शकत नाहीयत. वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावत आहेत. तर काही ठिकाणी ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होतोय. उत्तर प्रदेशच्या आगरा जिल्ह्यात अशीच एक घटना समोर आली आहे, ज्या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे (Wife breaths gave to husband through her mouth for save life in Agra).

ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू

आगऱ्यात ऑक्सिजन बेड वेळेवर न मिळाल्याने 47 वर्षीय रवी सिंघल यांचं निधन झालं आहे. त्यांच्या पत्नी रेनू सिंघल यांनी त्यांना वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. रेनू आपल्या पतीला रिक्षातून दोन-तीन रुग्णालयांमध्ये दाखल करण्यासाठी घेऊन गेल्या. मात्र, ऑक्सिजन बेड उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळे रेनू आपल्या पतीला रिक्षाने दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जात होत्या. पण यादरम्यान त्यांचे पती रवी यांनी जीव सोडला. रेनू यांनी पतीला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. रवी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पत्नी रेनूने तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. पण सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.

तीन रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला नाही

सिंघल कुटुंब आगऱ्यात विकास सेक्टर सात येथे वास्तव्यास आहे. दरम्यान, घरातला कर्ता पुरुष रवी सिंघल यांची प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे पत्नी रेनू यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीने रवी यांनी रुग्णालयात रिक्षाने नेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला रेणू आपल्या पतीला घेऊन श्रीराम हॉस्पिटलला घेऊन गेल्या. त्यानंतर साकेत हॉस्पिटल, केसी नर्सिंग होम येथे घेऊन गेल्या. मात्र, या तीनही ठिकाणी ऑक्सिजन बेड मिळाला नाही (Wife breaths gave to husband through her mouth for save life in Agra).

एसएन मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरांकडून रुग्ण मृत घोषित

तीन ठिकाणी ऑक्सिजन बेड उपलब्ध न झाल्याने रेनू आपल्या पतीला घेऊन एसएन मेडिकल कॉलेज येथे पोहोचल्या. पण तिथल्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर रवी यांनी मृत घोषित केलं. रेनू यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांना सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. रेनू यांनी रुग्णालयातच टाहो फोडला. विशेष म्हणजे रवी यांच्यासारखे अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेडसाठी वणवण फिरावं लागत आहे. महामारीच्या या भयानक दृश्याने आख्खा देश हादरला आहे.

हेही वाचा : 

‘दोन तास ऑक्सिजन नव्हता, माझा भाऊ तडपून तडपून गेला, हाताशी आलेला भाऊ गेला’, रुग्णालयाबाहेर भावाचा आक्रोश

‘माझी मम्मी क्लीअर झालेली, ऑक्सिजन संपला, फडफड कोंबडीवाणी मेली ती’, झाकीर रुग्णालयाबाहेर महिलेचा आक्रोश

Non Stop LIVE Update
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.