नवऱ्याने केला होता खून; 13 वर्षांनतर बायको जिवंत सापडली

| Updated on: Aug 01, 2022 | 9:30 PM

उत्तर प्रदेशातील बहराइचमधील एक महिलेच्या हत्ये प्रकरणात तिच्या पतीला दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, शिक्षा झालेल्या व्यक्तीती मृत प्तनी तिच्या बहिणीच्या घरी जिवंत सापडली आहे. 2009 मध्ये या महिलीचा हत्या झाल्याची तक्रार दाखल झाली होती.

नवऱ्याने केला होता खून; 13 वर्षांनतर बायको जिवंत सापडली
Follow us on

बहराइच : नवऱ्याने आपल्या पतीची हत्या(murder) केली होती मात्र तेरा वर्षानंतर त्याची पत्नी जिवंत सापडली आहे. हा कोणत्याही सस्पेन्स मूव्हीचा सीन नाही तर ही सत्य घटना आहे. उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) ही आश्चर्यकारक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीला कोर्टाने दहा वर्षाची शिक्षाही सुनावली. मात्र, या दरम्यान त्याने शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. या प्रकरणावर उच्च न्यायालयात खटला सुरू असताना त्याची पत्नी जिवंत असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे पोलिसांसह न्यायाधीशही गोंधळले आहेत.

उत्तर प्रदेशातील बहराइचमधील एक महिलेच्या हत्ये प्रकरणात तिच्या पतीला दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणी त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, शिक्षा झालेल्या व्यक्तीती मृत प्तनी तिच्या बहिणीच्या घरी जिवंत सापडली आहे. 2009 मध्ये या महिलीचा हत्या झाल्याची तक्रार दाखल झाली होती.

पत्नीच्या हत्ये प्रकरणी दहा वर्षांची शिक्षा

बहराइचचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी), अशोक कुमार यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे. जामापूर गावातील रहिवासी असलेल्या कंधाईचे 2006 मध्ये रामवती नावाच्या महिलेशी विवाह झाला होता. मात्र, 2009 मध्ये रामवती रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी कोर्टात जाऊन कंधईविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. 2017 मध्ये, न्यायालयाने कंधाईला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. यानंतर कंधाई यांने उच्च न्यायालयात दाद मागितली आणि त्याला सहा महिन्यांनी जामीन मिळाला.

नातेवाईला त्याची पत्नी जिवंत दिसली

दरम्यान, शनिवारी कंधाई याच्या एका नातेवाईकाला त्याची पत्नी जिवंत दिसली. रामवतीला त्याने तिच्या बहिणीच्या घरी पाहिले. यानंतर या व्यक्तीने कंधाई याला त्याची पत्नी जिवंत असल्याचे सांगीतले. यानंतर कंधाई याने पोलिसांना ही माहिती दिली. रामगावचे एसएचओ संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथक महिला पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले, जेथे रामवती उपस्थित होती.
यानंतर या महिलेला वन स्टॉप सेंटरमध्ये नेण्यात आले, जिथे हिंसाचाराने पीडित महिलांना आश्रय दिला जातो. रामवती यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. रामवती जिवंत सापडल्याने कंधाई याची त्याने जो गुन्हा केलाच नाही त्यातून सुटका होणार आहे.

रामावती जिवंत असताना तिच्या नातेवाईंकांनी ती मृत असल्याचे का सांगीतले? एवंढी वर्ष ती लपून राहिली का? या सर्व प्रश्ंनांची उत्तर पोलिस शोधत आहेत. मात्र, कौटुंबिक वादातून हा सर्व प्रकार घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.