AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Election News LIVE : ​प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश

| Edited By: | Updated on: Dec 18, 2025 | 3:01 PM
Share

BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates: मागच्या तीन-चार वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महापालिका जिंकल्यानंतर मिळणारी सत्ता ही तळागाळात पक्ष विस्ताराची संधी असते. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी महापालिका जिंकणं महत्वाचं आहे.

Maharashtra Election News LIVE : ​प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश
Election

LIVE NEWS & UPDATES

  • 18 Dec 2025 03:01 PM (IST)

    जळगाव जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान आणि 21 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

    जळगाव जिल्ह्यात 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदान आणि 21 रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

    त्या त्या तालुक्यांमध्ये मतदान केंद्रासाठी ठिकाण निश्चित करण्यात आले असून मतमोजणीची तयारी देखील पूर्ण करण्यात आली

    जळगाव जिल्ह्यात भुसावळ, पाचोरा, अमळनेर, वरणगाव, यावल आणि सावदा या सहा तालुक्यांमधील एकूण 12 प्रभागांसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार

    जिल्ह्यातील 18 नगरपरिषदा तसेच पंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतमोजणी पार पडणार असून त्यासाठीची पोलीस बंदोबस्त आणि तयारी पूर्ण करण्यात आली.

  • 18 Dec 2025 02:43 PM (IST)

    महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभू्मीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

    पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुकांच्या मुलाखती

    राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे, आमदार बापूसाहेब पठारे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्याकडून इच्छुकांच्या मुलाखती

    मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी

  • 18 Dec 2025 02:15 PM (IST)

    नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

    नाशिकमध्ये शिवसेना कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

    आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत सुरु आहेत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती

    मुलाखतीसाठी उमेदवारांकडून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात गर्दी

  • 18 Dec 2025 01:55 PM (IST)

    माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू

    नाशिक- माणिकराव कोकाटे अटक वॉरंट प्रकरणी नाशिक पोलिसांकडून कायदेशीर बाबींची पडताळणी सुरू आहे. पथक पाठवण्याबाबत दुपारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. कोकाटे सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.

  • 18 Dec 2025 01:45 PM (IST)

    अनधिकृत बांधकाम असलेल्या उमेदवारांची उमेदवारी धोक्यात

    अनधिकृत बांधकाम असलेल्या उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आहे. उमेदवारांकडून अनधिकृत बांधकाम नसल्याचं शपथपत्र घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. अनधिकृत बांधकाम आढळल्यास उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कडक इशारा दिला आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

    निवडणूक अधिकारी, सहायक अधिकारी, पोलीस, महसूल आणि महापालिका प्रशासनाची संयुक्त बैठक झाली. निवडणूक आचारसंहिता, उमेदवारी अर्जांची छाननी, मतदान केंद्रांची तयारी आणि मतमोजणी प्रक्रियेवर सविस्तर चर्चा झाली. शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  • 18 Dec 2025 01:30 PM (IST)

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात

    धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोचा अपघात  झाला आहे. या अपघातामध्ये 32 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले असून तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. धुळे-सोलापूर रोडवरील बावी पाटीजवळ ही घटना घडली.

    उमरगा येथील निवासी मूकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित केलेल्या शिबिरासाठी येत असताना अपघात झाला. विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने टेम्पो खड्ड्यामध्ये जाऊन पलटी झाला.

  • 18 Dec 2025 01:15 PM (IST)

    ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी घेतली मनसे नेते राजू पाटील यांची भेट

    डोंबिवली- ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी मनसे नेते राजू पाटील यांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे केडीएमसीची निवडणूक एकत्रित लढवणार असल्याची माहिती आमदार वरूण सरदेसाई यांनी दिली.

  • 18 Dec 2025 12:57 PM (IST)

    मुरुड नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना–काँग्रेस एकत्र

    रायगड जिल्ह्यातील मुरुड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शिवसेना शिंदे गट आणि इंदिरा गांधी काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याचे बॅनर झळकले होते. या बॅनरचा फोटो ट्विट करत अंबादास दानवे यांनी “बाण आणि पंजा एका साथ” असं म्हणत शिवसेनेवर निशाणा साधला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री भरत गोगावले यांनी अंबादास दानवेंनी “एवढं नाकाला म्हाका लावू नये,” असा टोला लगावत, आम्ही जनतेच्या हितासाठी एकत्र येतो, स्वार्थासाठी नाही, असं स्पष्ट केलं आहे.

  • 18 Dec 2025 12:45 PM (IST)

    डोंगराळे प्रकरणात आजपासून सुनावणी

    मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर आज पहिली सुनावणी होणार आहे. डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी नागपूर अधिवेशनात करण्यात आली होती. या प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनांतून होत आहे.१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर आज आरोपी विजय खैरनारला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

  • 18 Dec 2025 12:35 PM (IST)

    नबाब मलिक आमचे शत्रू आहेत-संजय शिरसाट

    मुंबई मध्ये येणारी निवडणूक शिवसेना भाजप महायुती मधे लढणार ही जवळपास निश्चित झाले आहे. ज्या पक्षाचे नेतृत्व नवाब मलिक करेल त्यांच्याशी युती नाही असे भाजपने स्पष्ट केले. त्यांचा निर्णय आहे आमचा विरोध करायचे कारण नाही. मराठी माणूस, मुंबई या विषयावर निवडणूक लढविली जाईल. महायुतीचा भगवा मुंबईवर कसा फडकेल. नवाब मलिक आमचे शत्रू आहे हे आम्ही जाहीर केले आहे.त्यांच्यामुळे युती तुटत आहे. त्यांनी शरद पवार सोबत करावी किंवा कुणासोबत करावी.त्यांचा पक्ष आहे, अशी टीका मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे.

  • 18 Dec 2025 12:20 PM (IST)

    चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराच्या मुलाखती

    चंद्रपूर महानगरपालिकेसाठी इच्छुक असलेल्या भाजप उमेदवारांच्या आज मुलाखती होणार आहे. चंद्रपूर मनपासाठी निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले आमदार चैनसुख संचेती मुलाखती घेतील. दुपारी 12 नंतर चंद्रपूर शहरातील एनडी हॉटेल येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत

  • 18 Dec 2025 12:12 PM (IST)

    एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा

    अंबरनाथ मध्ये मुख्यमंत्री यांच्या सभेनंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. शिंदेच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या प्रचारसाठी उपमुख्यमंत्री अंबरनाथमध्ये सभा घेत आहेत. आज सायंकाळी ६ वाजता या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपत्री शिवाजी महाराज चौक परिसरात सभेच आयोजन करण्यात आले आहे.

  • 18 Dec 2025 12:01 PM (IST)

    सबका साथ, सबका विकास या धोरणावर काम करणार

    काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. त्यांच्यसोबत अनेक कार्यकर्ते सुद्धा भाजपमध्ये दाखल झाले. कालपासून प्रज्ञा सातव या काँग्रेस सोडून भाजपमध्ये येणार असल्याची चर्चा रंगली होती.

  • 18 Dec 2025 11:56 AM (IST)

    जळगाव सराफ बाजारात चांदीने सर्व उच्चांक मोडले, दोन लाखांचा टप्पा ओलांडला

    जळगावच्या सुवर्ण नगरीत चांदीच्या दराने आजवरच्या इतिहासातील सर्व उच्चांक मोडीत काढले असून, पहिल्यांदाच चांदीचा दर २ लाख ६ हजार रुपयांवर (जीएसटीसह) पोहोचला आहे. सलग दुसऱ्या दिवशी चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली असून, आज एकाच दिवसात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या दोन दिवसांत चांदी तब्बल ९ हजार रुपयांनी महागली आहे. चांदीच्या या झळाळीसोबतच सोन्याच्या दरातही आज २०० रुपयांची किरकोळ वाढ झाली असून, सोन्याचे भाव १ लाख ३६ हजार २०० रुपयांवर (जीएसटीसह) स्थिरावले आहेत. लग्नसराईच्या काळात होत असलेल्या या प्रचंड दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

  • 18 Dec 2025 11:50 AM (IST)

    हॉटेल माझं नाही असं प्रकाश शिंदे का बोलले? सुषमा अंधारेंचा सवाल

    मी शंभूराज देसाईंच्या केसला घाबरत नाही, मी त्यांना उत्तर देईन. हॉटेल तेजयश हे प्रकाश शिंदे यांच्या मालकीचं आहे. हॉटेलच्या बुकींगसाठी प्रकाश शिंदेंचा संपर्क क्रमांक असल्याचा खुलासा सुषमा अंधारे यांनी केला आहे. हॉटेल माझं नाही, असं प्रकाश शिंदे का बोलले, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे.

  • 18 Dec 2025 11:39 AM (IST)

    कोकाटेंचा पदभार काढून घेतल्याबद्दल फडणवीसांचे कौतुक – सुप्रिया सुळे

    सत्तेतील लोकांना वेगळा आणि विरोधातील लोकांना वेगळा न्याय आहे. माणिकराव कोकाटे यांचा पदभार काढून घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करते, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

  • 18 Dec 2025 11:35 AM (IST)

    सार्वजनिक शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद, शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे तक्रार

    पूर्णा तालुक्यातील फुकटगाव शिवारातील सार्वजनिक शिवरस्ता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. ऊस वाहतूक ठप्प झाल्याने आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे रस्ता तात्काळ मोकळा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 18 Dec 2025 11:23 AM (IST)

    परभणीत ऊस दराबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक निष्फळ, तीव्र आंदोलन करणार

    परभणीत ऊस दराबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. मात्र ऊस उत्पादक संघर्ष समिती आणि जिल्हास्तरीय समितीचे एकमत न झाल्याने ही बैठक निष्कळ ठरली. त्यामुळे संघर्ष समितीने तीव्र आंदोलनाचा निर्धार केला आहे.

  • 18 Dec 2025 11:12 AM (IST)

    परभणीत अवैध वाळू उपसा सुरुच, महसूल विभागाची मात्र डोळेझाक

    परभणी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परभणीच्या मानवत–सेलू तालुक्यातील सांवगी मगर परिसरात दुधना नदीपात्रातून गेल्या 12 दिवसांपासून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. महसूल विभागाने मात्र याप्रकरणी डोळ्यावर पट्टी बांधल्याचे दिसत आहे.

  • 18 Dec 2025 11:03 AM (IST)

    भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात

    सातारा जिल्ह्यातील फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती विमानतळावर दाखल झाले. येथून ते थेट फलटणकडे रवाना झाले आहेत. काही वेळातच त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या माध्यमातून मुख्यमंत्री फलटणमधील मतदारांना काय आवाहन करतात आणि विरोधकांवर काय निशाणा साधतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 18 Dec 2025 10:46 AM (IST)

    मीरा-भाईंदर मतदार यादीत मोठा घोटाळा

    मीरा-भाईंदर मतदार यादीत मोठा घोटाळा.  मीरा-भाईंदरच्या मतदारांची नावे ठाणे महापालिकेच्या यादीत घुसवली गेली आहेत असा आरोप करण्यात आला आहे.

    काशिमीरा प्रभाग १४ मधील चेनापाडा, काजूपाडा, माशाचा पाडा परिसरातील हजारो मतदारांची नावे थेट ठाणे महानगरपालिकेच्या यादीत दिसत आहेत.  मीरा-भाईंदर महापालिकेच्या प्रारूप यादीत असलेली ही नावं अंतिम यादीतून वगळली.  तर त्याच मतदारांना गायमुख येथील त्रिमूर्ती शाळेच्या बूथवर ठाण्याच्या यादीत दाखवले आहे अशी माहिती समोर आली आहे.

  • 18 Dec 2025 10:40 AM (IST)

    प्रज्ञा सातव यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

    प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सातव यांनी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. त्या लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

  • 18 Dec 2025 10:30 AM (IST)

    अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी – संजय राऊत

    अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं आहे. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहेत , त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे युती करणं म्हणजे भाजपचे हात बळकट करण्यासारखं आहे. काहीही झालं तरी अजित पवार हे अमित शाह आणि भाजपच्याच पाठिशी उभे राहतील – संजय राऊतांचे विधान

  • 18 Dec 2025 10:22 AM (IST)

    धनंजय मुंडेना मंत्रिमंडळात घेतल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा दाखवू – मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

    धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या चर्चेनंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे.  धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्यास मराठा समाज अजित पवारांच्या राष्ट्रवादीला संपवल्याशिवाय राहणार नाही.  मुंडेला मंत्रिमंडळात घेतल्यास महापालिका आणि जिल्हा परिषदेत मराठा समाज राष्ट्रवादीला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देण्यात आला आहे.

    अजित पवारांनी आजपर्यंत मराठ्यांच्या जीवावर सत्ता उपभोगली आहे. धनंजय मुंडेना मंत्रिमंडळात घेतल्यास मराठा समाज राष्ट्रवादीला जागा दाखवेल, असाही इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

  • 18 Dec 2025 10:06 AM (IST)

    मुंबईत अजित पवारांची NCP शरद पवारांच्या गटासोबत लढण्यास इच्छुक ?

    मुंबईमध्ये अजित पवारांची NCP शरद पवारांच्या गटासोबत लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  अजित पवार गटाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचे प्रयत्न  सुरू असल्याचेही समजते. बुधवारी मुंबई विभागातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना अजित पवारांकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत येण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश देण्यात आले.

  • 18 Dec 2025 09:50 AM (IST)

    भाजप कोपरी मंडळाची शिंदेंच्या शिवसेने सोबत युतीला हरकत

    राज्यातील महापालिका निवडणुकीकरीता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना महायुतीची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याना न रुचल्याने या युती विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे. भाजप कोपरी मंडळ च्या वतीने शिवसेना पक्षाशी युतीबाबत हरकत नोंदविण्यात आली.

  • 18 Dec 2025 09:30 AM (IST)

    नगरसेवकपदाची उमेदवारी मिळावी म्हणून भाजपा कार्यकर्त्याचा थेट नेत्यांनाच इशारा

    मला उमेदवारी मिळायलाच हवी अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट झाल्यास याला पक्ष जबाबदार. सोलापूर शहर भाजपकडून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटप करताना निष्ठावंत कार्यकर्ते डोकेदुखी ठरण्याची शक्यता. सोलापूर शहर भाजपमध्ये गेल्या 40 वर्षापासून काम करणारे कार्यकर्ते अनंत धुम्मा यांनी उमेदवारीवरून थेट पक्षातील नेत्यांनाच ईशारा दिलाय

  • 18 Dec 2025 09:20 AM (IST)

    शिवसेना गटाला विदर्भात मोठा राजकीय धक्का

    युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य इंजि. निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. इंजि. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • 18 Dec 2025 09:10 AM (IST)

    सावकारी जाचातून किडनी विकल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा

    पीडित शेतकरी रोशन कुडे याची डावी किडनी काढण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालात उघड. काल रात्री उशिरा पोलिसांना मिळाला कुडे याचा वैद्यकीय अहवाल. वैद्यकीय अहवालात किडनी काढण्यात आल्याचं स्पष्ट झाल्याने आता पोलिसांच्या तपासाला येणार वेग, विशेषतः फिर्यादी शेतकऱ्याने चेन्नई येथील एका डॉक्टरने त्याला कंबोडिया येथे जाण्यात मदत केल्याचा केला आहे तक्रारीत उल्लेख,

  • 18 Dec 2025 09:00 AM (IST)

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला विदर्भात मोठा राजकीय धक्का

    युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले, पूर्व विदर्भ युवासेना सचिव महाराष्ट्र राज्य तसेच विदर्भातील पहिले आणि एकमेव गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य इंजिनिअर निलेश बेलखेडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. निलेश बेलखेडे यांच्या प्रवेशामुळे विदर्भातील युवा वर्गात भाजपची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. या निर्णयामुळे शिवसेना (उबाठा) गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

  • 18 Dec 2025 08:51 AM (IST)

    प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचं निधन

    प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीत नोएडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 18 Dec 2025 08:47 AM (IST)

    महायुतीच्या विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात पडली

    राज्यातील महापालिका निवडणुकीकरीता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना महायुतीची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र, वरिष्ठ नेत्यांचा हा निर्णय भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्याना न रुचल्याने या युती विरोधात पहिली ठिणगी ठाण्यात पडली आहे. भाजप कोपरी मंडळच्या वतीने शिवसेना पक्षाशी युतीबाबत हरकत नोंदविण्यात आली आहे. कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांनी शिंदेंच्या शिवसेनेने यापूर्वी केलेल्या कुरघोडींचा पाढाच जाहिर पत्रकार परिषदेत वाचला.

  • 18 Dec 2025 08:33 AM (IST)

    माणिकराव कोकाटे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा

    माणिकराव कोकाटे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला आहे. माणिकराव कोकाटेंची खाती अजित पवारांकडे आहेत. नाशिकमधील सदनिका गैरव्यवहार प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. त्यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कोकाटेंच खात काढण्याची काल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केली होती.

  • 18 Dec 2025 08:30 AM (IST)

    कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का

    एकाच दिवशी दोन महिला शहर अध्यक्षांचे राजीनामे. मंदा पाटील आणि कस्तुरी देसाई यांचा मनसेला ‘जय महाराष्ट्र’. ​कल्याण-डोंबिवली मनसेत बंडाचे निशाण. माजी आमदार राजू पाटलांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. दादांनी मुद्दामून फोन उचलला नाही, कष्टाची किंमत नाही; माझ्यावर अन्याय झाला नेमकी माझी चुकी काय ? असे सांगत मंदा पाटलांचा मनसेला निरोप.

महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय पक्षांमध्ये पक्षांतर सुरु झाली आहेत. राजकीय भविष्यासाठी अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या राजकीय निष्ठा बदलत आहेत. पुढच्या काही दिवसात या राजकीय घडामोडींना अजून वेग येईल. सेना-भाजप युती जाहीर झाली नाही, ना कुणाला उमेदवारी देण्यात आली, ना कोणाला डावलण्यात आलं. मग नाराजी कसली?. कोणीही शिवसेनेत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. नाराज शिवसैनिकांना शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांचा थेट इशारा. दोन दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे निष्ठावान शिवसैनिकांना डावलत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. काही शिवसैनिकांनी विरोध केला होता.

Published On - Dec 18,2025 8:27 AM

Follow us
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.