अभिजीत दिपके सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात परतणार का? काय आहे नवीन अपडेट?
अभिजीत दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांची जामिनावर सुटका झाली आहे. कार्यकारी दंडधिकाऱ्यांनी तिघांची जामिनावर सुटका झाल्यानंतर महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलनाची हाक दिली होती. परंतु सीजेपीच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत विमानातूनच अटक करण्यात आली. पोलिसांनी आंदोलनाआधीच तिघांना ताब्यात घेतलं. या तिघांना पोलिसांनी आज रविवारी कार्यकारी दंडधिकाऱ्यापुढे हजर केलं. त्यानंतर पोलिसांनी कार्यकारी दंडधिकाराऱ्यांनी तिघांची जामिनावर सुटका केली. आता सुटका झाल्यानंतर अभिजीत दिपके महाराष्ट्रात परतणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीने आज पुन्हा आंदोलनाची हाक दिली होती. सीजेपीने आज तिघांच्या सुटकेसाठी आंदोलनाची हाक दिली होती. परंतु आज पोलिसांनी तिघांना कोर्टात हजर केलं. त्यानंतर कार्यकारी दंडधिकारी कोर्टाने तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. दुसरीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या आजीचे काल निधन झालं. त्यांच्या आजीवर आज रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यामुळे अभिजीत दिपके हे महाराष्ट्रात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
दिपकेंच्या आजीच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार
अभिजीत दिपके यांच्या आजीच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे. त्रिशरण-पंचशील विधी झाल्यानंतर हिंगोलीच्या संतुक पिंप्री गावातून अंत्ययात्रा पार पडणार आहे. अभिजित दिपके आमच्या दुःखात सामील नाहीत यांची खंत आहे. सर्वांच्या भल्यासाठी अभिजित दिपके काम करतो ही चांगली गोष्ट आहे. परंतु दिल्ली पोलिसांनी अशा प्रकारे डांबून ठेवणे ,अटक करणे,आजीचा मृत्यू झाल्यानंतर अडवून ठेवणे,देशाला काळिमा फासणारी बाब आहे. सरकार आणि दिल्ली पोलिसांचा निषेध करतो, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
सीजेपी नेत्यांवर आरोप काय?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके, सौरव दास, आशुतोष रांका यांना विमानातून ताब्यात घेण्यात आलं. तिघांवर शहराची शांतता भंग करणार असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी तिघांवर कलम 107/51 अंतर्गत शांतता भंग होण्याआधी ताब्यात घेतलं होतं. त्यांना आज सकाळी कार्यकारी दंडधिकाऱ्यासमोर हजर केलं. मिळालेल्या माहितीनुसार, तिघांवर कोणत्याही प्रकारचा एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.