युक्रेनला संपवूनचं थांबणार पुतीन?, 3 लाख रशीयन सैनिकांना राखीव ठेवण्याचं कारण काय

| Updated on: Sep 22, 2022 | 3:52 PM

रशीयनं सेनेनं पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या दोन्ही बाजूला आपला कब्जा केलाय. या भागात जनमत चाचणी 23 ते 27 सप्टेंबरला होणार आहे. युक्रेनला करारा जवाब देण्यासाठी यंत्रणा सज्ज केली.

युक्रेनला संपवूनचं थांबणार पुतीन?, 3 लाख रशीयन सैनिकांना राखीव ठेवण्याचं कारण काय
युक्रेनला संपवूनचं थांबणार पुतीन?
Image Credit source: PTI
Follow us on

यंदा 24 फेब्रुवारीला रशिया-युक्रेन यांच्या युद्ध सुरू झालं. आता रशिया तीन लाख सैनिक राखीव ठेवणार असल्याची माहिती मिळते. हा रशियाचे राष्ट्रपती ब्लादिनीर पुतीन यांच्या मेघाप्लानचा ब्लुप्रींट आहे. शेवटी तीन लाख सैनिक राखीव ठेवण्यामागची कारण काय आहेत. युक्रेन-रशियाचं युद्ध गेल्या सहा महिन्यांपासून सुरूचं आहे. मृतदेह, इमारतींचा मलबा पाहायला मिळतो. येवढं होऊनही अद्याप युद्ध थांबलेलं नाही.

युक्रेनमधील कित्तेक शहरांचा मलबा झाला आहे. हसते-खेळते लाखो कुटुंबीय निस्तनाबूत झालेत. हजारो लोकं आईच्या मायेपासून दूर लोटले गेलेत. लाखो लोकं युक्रेन सोडून शेजारी देशांकडं शरण गेलेत. या युद्धात प्राण वाचले तरी पुढचं जीवन कसं जगायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

रशियानं युक्रेनला अद्याप माफ केलेलं नाही. युक्रेन यातून कसं कमी नुकसान होईल, याचा विचार करत आहे. युक्रेनसोबत युद्धासाठी रशियानं तीन लाख सैनिक राखीव ठेवण्याचे जाहीर केले. पश्चिमी देश रशियाचे तुकडे होताना पाहू इच्छितात. रशिया तुकड्या-तुकड्यात विभागला गेल्यास पश्चिमी देश सामर्थ्येशाली बनणार आहेत.

पुतीन यांनी म्हंटलं की, देशाच्या सुरक्षेसाठी घातक पाऊलं उचलावं लागेल.तीन लाख सैनिकांकडून पुतीन कोणतं काम करून घेणार. रशियाच्या चारही बाजूला ते आपलं वर्चस्व ठेऊ इच्छितात. रशीयनं सेनेनं पूर्व आणि दक्षिण युक्रेनच्या दोन्ही बाजूला आपला कब्जा केलाय. या भागात जनमत चाचणी 23 ते 27 सप्टेंबरला होणार आहे. युक्रेनला करारा जवाब देण्यासाठी यंत्रणा सज्ज केली.

तीन लाख सैनिक राखीव ठेवण्यात आल्यानं नागरिक सजग झालेत. रशियाच्या नागरिकांमध्ये देश सोडण्याचं प्रमाण वाढतंय. 18 ते 65 वर्षांच्या व्यक्तीच्या परदेशी जाण्यावर रोख लावण्यात आलाय. टर्की, आर्मिनियासह इतर देशात जाणारी विमान फूल आहेत. सुरक्षा मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय कुणाचंही तिकीट जारी होणार नाही.