
मुंबई : ओबीसी क्रिमिलेअरची (OBC Crimilayer) मर्यादा लवकरच आठ लाखांहून वाढून दहा लाख इतकी होण्याची शक्यता आहे. ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा दोन लाखांनी वाढवण्याचा विचार केंद्र सरकार (Central Government) करत आहे. ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा दर तीन वर्षांनी वाढविण्याची तरदूद कायद्यात आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या आधी सरकारकडून 2017 मध्ये ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख रुपयांवरून आठ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र त्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र आता क्रिमिलेअरची (Crimilayer) मर्यादा वाढवण्यचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडू मिळत आहे. लवकरच क्रिमिलेअरची मर्यादा आठ लाखांहून दहा लाखांपर्यंत जाऊ शकते.
ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढविण्याबाबत सरकारने काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. क्रिमिलेअरच्या मर्यादेची निश्चिती केवळ आर्थिक आधार असू शकत नाही. तर त्यामध्ये सामाजिक आणि अन्य बाबींचा देखील विचार व्हावा असे एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. आता ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढवताना सर्वोच्च न्यायालयाच्या या टीपनीचा देखील विचार करण्यात येणार आहे. तसेच मर्यादा वाढविण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी देखील अमलात आणल्या जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा दर तीन वर्षांनी वाढवण्यात यावी अशी तरदूद घटनेत आहेत. 2017 मध्ये ओबीसी क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आली होती. सहा लाखांहून आठ लाख रुपये करण्यात आली होती. मात्र त्याला आता पाच वर्ष झाले आहेत. त्यामुळे यंदा तरी क्रिमिलेअर मर्यादेमध्ये बदल होणार अशी अपेक्षा आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्राच्या हालचालींना वेग आला आहे.
Today petrol, diesel rates : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे दर जाहीर, पेट्रोल, डिझेलचे भाव स्थिर
Bank opening time : आजपासून बँकेच्या वेळेमध्ये बदल, सकाळी 9 वाजेपासून सुरू होणार बँका
Campus Activewear : ‘ही’ फुटवेअर बनवणारी कंपनी पुढील महिन्यात आणणार आपला IPO