AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar: 2024 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधक एकवटणार?, नितीशकुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले पंतप्रधान होण्यात..

राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्या या भेटीकडे भाजपा नेतृत्वाचेही लक्ष असणार. दोन्ही नेत्यांच्या या स्मित हास्यातील फोटोमुळे भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चिंतेत थोडी भर नक्की पडली असणार, असे सांगण्यात येते आहे. नितीशकुमार महाआघाडीत गेल्याने, भाजपासमोर थोडी चिंता वाढलेली दिसते आहे.

Nitish Kumar: 2024 लोकसभा निवडणुकांसाठी विरोधक एकवटणार?, नितीशकुमारांनी घेतली राहुल गांधींची भेट, म्हणाले पंतप्रधान होण्यात..
या भेटीचा अर्थ काय? Image Credit source: ANI
| Edited By: | Updated on: Sep 05, 2022 | 9:42 PM
Share

नवी दिल्ली – बिहारमध्ये नुकतीच भाजपाची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar)यांनी राष्ट्रीय जनता दलासोबत हातमिळवणी केली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार सोमवारी दिल्लीत पोहचले. दिल्लीत आाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi)यांची भेट घेतली आहे. या भेटीत काय चर्चा झाली हे समोर आले नसले तरी, 2014 च्या लोकसभा निवडणुकांसाठी रणनीतीच्या तयारीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. याच निवडणुकांच्या दृष्टीने या दोन्ही नेत्यांची चर्चा झाल्याची माहिती आहे. नितीश दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी भाजपाविरोधात (BJP) विरोधकांची एकजूट करण्यासाठी आलो असल्याचे त्यांनी सांगितले होते.

नितीश आणि राहुल यांची भेटीनंतर सुहास्यमुद्रा

नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्या भएटीनंतरचा पहिला फोटो समोर आला आहे. यात या दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर स्मीत हास्य दिसते आहे. याचा अर्थ असा की नितीश कुमार जो प्लॅन घेऊन दिल्लीत आले होते तो सफल झाला असल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांना राष्ट्रीय पातळीवर सक्रिय होण्यासाठी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर काँग्रेसला बिहारमध्ये नितीश कुमार यांची गरज आहे. या दोन्ही नेत्यांच्या देहबोलीवरुन ही भेट सकारात्मक झाली असल्याचे सांगण्यात येते आहे.

पंतप्रधानांच्या उमेदवारीबाबत नितीश यांचे मोठे वक्तव्य

राहुल गांधी यांना भेटण्यापूर्वी नितीशकुमार यांनी पंतप्रधानपदाच्या दावेदारीबद्दल मोठे विधान केले आहे. पंतप्रधान होण्याची कोणतीही इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. विरोधकांनी एकत्र येऊन भाजपाशी लढा द्यावा, हीच आपली इच्छा असल्याचे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले. जर विरोधक एकत्र आले तर भविष्यासाठी हे चांगले असेल, असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

भाजपाच्या अडचणी वाढणार?

राहुल गांधी आणि नितीश कुमार यांच्या या भेटीकडे भाजपा नेतृत्वाचेही लक्ष असणार. दोन्ही नेत्यांच्या या स्मित हास्यातील फोटोमुळे भाजपा पक्षश्रेष्ठींच्या चिंतेत थोडी भर नक्की पडली असणार, असे सांगण्यात येते आहे. नितीशकुमार महाआघाडीत गेल्याने, भाजपासमोर थोडी चिंता वाढलेली दिसते आहे. काँग्रेस आणि नितीशकुमार यांच्यातील ही जवळीक किती परिणामकारक असेल हे येणारा काळच ठरवणार आहे. नितीश कुमार आणि त्यांची पार्टी आगामी 2024 च्या तयारीला लागले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीत येण्यापूर्वी लालूप्रसाद यादव यांचीही घेतली भेट

दिल्लीत संध्याकाळी येण्यापूर्वी त्यांनी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचीही भेट घेतली होती. या भेटीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही समान विचारधारेचे आहोत, सगळ्या बाबींवर आमचे एकमत आहे. या भेटीनंतर विरोधकांच्या एकजुटीसाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर ते दिल्लीत पोहचले आहेत.

हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.