AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदू नाही राहिला, तर जग नाही राहणार…मणिपूरमध्ये मोहन भागवत असं का म्हणाले?

RSS Chief Mohan Bhagwat : "आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे.

RSS Chief Mohan Bhagwat : हिंदू नाही राहिला, तर जग नाही राहणार...मणिपूरमध्ये मोहन भागवत असं का म्हणाले?
RSS Chief Mohan Bhagwat
| Updated on: Nov 22, 2025 | 12:11 PM
Share

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत मणिपूर दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी आपल्या संबोधनात त्यांनी सभ्यता, समाज आणि राष्ट्र शक्ती याचा उल्लेख केला. या दरम्यान मोहन भागवत म्हणाले की, “आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यात हिंदू समाज राहणार. जर हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही” “परिस्थितीचा विचार सर्वांना करावा लागतो. परिस्थिती येते-जाते. जगातील सगळ्या देशांवर वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आली. काही देश त्यात समाप्त झाले. यूनान, इजिप्त आणि रोमा सगळे संपले” असं भागवत म्हणाले.

“भारत हे एका अमर समाज, अमर सिविलायजेशनच नाव आहे. बाकी आले, चमकले आणि निघून गेले. या सर्वांचा उदय आणि अस्त आपण पाहिला आहे. आपण आताही आहोत आणि राहणार. कारण आपण समाजाचं एक बेसिक नेटवर्क बनवलं आहे. त्यामुळे हिंदू समाज राहणार. हिंदू राहिला नाही, तर जग राहणार नाही. कारण हिंदू समाजच जगाला वेळोवेळी धर्माचा योग्य अर्थ सांगतो आणि मार्गदर्शन करत असतो. हे आपलं ईश्वर प्रदत्त कर्तव्य आहे” असं मोहन भागवत म्हणाले.

पण तो आवाज दडपू दिला नाही

भागवत म्हणाले की, “प्रत्येक समस्येचा अंत शक्य आहे. त्यांनी नक्षलवादाचं उदहारण दिलं. जेव्हा समाजाने ठरवलं की, हे सहन करायचं नाही, तेव्हा हे संपलं” “ब्रिटिश साम्राज्याच्या सूर्याचा अस्त नाही व्हायचा. पण भारतात त्यांच्या सूर्यास्ताची सुरुवात झाली. त्यासाठी आपण 90 वर्ष प्रयत्न केले. 1857 ते 1947. दीर्घकाळ स्वातंत्र्यासाठी आपण लढत होतो. तो आवाज कधी आपण दबू दिला नाही. कधी आवाज कमी झाला, कधी वाढला. पण तो आवाज दडपू दिला नाही” असं मोहन भागवत यांनी सांगितलं.

आपलं लक्ष्य काय पाहिजे?

मोहन भागवत यांनी आत्मनिर्भर अर्थव्यवस्थेवर भर दिला. देशाने कधी कोणावर अवलंबून राहू नये. “आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आत्मनिर्भर असली पाहिजे. आपण कोणावरही डिपेंडेंट असता कामा नये. आपल्याकडे इकोनॉमिक एबिलिटी, मिलिट्री एबिलिटी आणि नॉलेज एबिलिटी असली पाहिजे. ती वाढली पाहिजे. देश सुरक्षित, समृद्ध राहिला पाहिजे. कुठलाही नागरिक दु:खी, दरिद्री आणि बेरोजगार राहू नये हे आपलं लक्ष्य पाहिजे. सगळ्यांनी देशासाठी काम करुन आनंदात रहावं” असं मोहन भागवत म्हणाले.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.