AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही – मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताचे वर्णन मूळतः "हिंदू राष्ट्र" असे केले आहे. भारत आणि हिंदू हे समानार्थी शब्द आहेत असे ते म्हणाले. भागवत यांनी संघाचे चारित्र्य निर्माण करण्याचे आणि भारताला जागतिक नेता बनवण्याचे ध्येय अधोरेखित केले. घुसखोरी आणि लोकसंख्या धोरणाबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली.

Mohan Bhagwat : भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही - मोहन भागवत
हिंदू राष्ट्राबद्दल सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान
| Updated on: Nov 19, 2025 | 10:12 AM
Share

ज्याला भारताचा गर्व आहे, अभिमान आहे, तो (व्यक्ती) हिंदू आहे, असे वक्तव्य  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. हिंदू धर्म केवळ धार्मिक नव्हे तर तो एक सभ्यतावादी आहे, अशा शब्दांत भागवत यांनी हिंदू धर्माचे वर्णन केलं. भारत आणि हिंदू हे एकच आहेत, ते समानार्थी शब्द आहेत. मोहन भागवत यांनी भारताचे वर्णन मूळतःहिंदू राष्ट्रअसे केले. तसेच आरएसएसचे चारित्र्य निर्माण आणि एकतेच्या ध्येयावर त्यांनी भर दिला.

गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची गरज नाही, त्याच्या संस्कृतीतून ते आधीच प्रतिबिंबित होतं, असं ते म्हणाले. हिंदू हा केवळ एक धार्मिक शब्द नाही तर एक सभ्य ओळख आहे, जी हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेली आहे असेही मोहन भागव यांनी नमूद केलं.

भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी संघाची स्थापना

भारत आणि हिंदू हे समानार्थी शब्द आहेत. भारतालाहिंदू राष्ट्रम्हणून घोषित करण्यासाठी कोणत्याही अधिकृत घोषणेची आवश्यकता नाही. त्याच्या सभ्य स्वरूपातून ते आधीच प्रतिबिंबित होतं .” असं ते म्हणाले. संघाची स्थापना कोणाचाही विरोध करण्यासाठी किंवा त्याला हानी पोहोचवण्यासाठी नाही, तर चारित्र्य निर्माणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि भारताला जागतिक नेता बनवण्यासाठी योगदान देण्यासाठी झाली आहे असंही मोहन भागवत यांनी सांगितलं. विविधतेतून भारताला एकजूट करणं यालाच , याच पद्धतीली आरएसएस असं म्हटलं जातं.

घुसखोरीवर व्यक्त केली चिंता

आसाममधील लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील चिंता दूर करण्यासाठी आत्मविश्वास, दक्षता आणि स्वतःच्या भूमी आणि ओळखीबद्दल दृढ आसक्ती बाळगण्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी यावेळी केले. अवैध घुसखोरी, हिंदूंसाठी तीन अपत्यांचा आदर्श समाविष्ट करून संतुलित लोकसंख्या धोरणाची गरज आणि फुटीर धर्मांतरांना विरोध करण्याचे महत्त्व यासारख्या मुद्द्यांवरही मोहन भागवत यांनी भाष्य केलं. आत्मविश्वास, दक्षता आणि आपल्या भूमी आणि संस्कृतीशी आपण दृढ आसक्ती राखली पाहिजे असे ते म्हणाले. समाजातील सर्व घटकांनी निःस्वार्थपणे एकत्र काम केले पाहिजे असेही मोहन भागवनत यांनी नमूद केलं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.