PUBG खेळताना प्रेमात पडली… प्रियकरासाठी बॉर्डरही पार केली ! मुलांसोबत तिने पाकिस्तानातून भारत गाठला;

दुसऱ्या देशात राहणारी ही महिला प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ती तिथून तिच्या चारही मुलांसह निघाली आणि मजल दरमजल करत भारतात आली.

PUBG खेळताना प्रेमात पडली... प्रियकरासाठी बॉर्डरही पार केली !  मुलांसोबत तिने पाकिस्तानातून भारत गाठला;
| Updated on: Jul 04, 2023 | 11:22 AM

नवी दिल्ली : पंछी, नदियां, पवन के झोके… कोई सरहद इन्हे ना रोके ! देशांच्या सीमा या फक्त माणसांपुरत्याच मर्यादित असतात, पण प्रेमाला (love) काहीच मर्यादा, ना सीमा असते. प्यार मे कुछ सही गलत नही होता, असं म्हणतात. त्याचप्रमाणे प्रेमात पडलेल्यांना कसलीच तमा नसते. हे पुन्हा एकदा आठवायचं कारण म्हणजे पाकिस्तानात राहणारी एका महिला (pakistani woman came to India for lover) तिच्या प्रेमासाठी देशांच्या सीमा ओलांडून भारतात आली आहे.

ग्रेटर नोएडा येथून ही हैराण करणारी गोष्ट समोर आली आहे. पाकिस्तानात राहणारी ही महिला प्रेमात एवढी आकंठ बुडाली होती की तीतिच्या चारही मुलांसह भारतात येऊन पोहोचली. तिने कसलीच तमा बाळगली नाही, प्रियकराला भेटण्याच्या ओढीने तिने भारत गाठला. पोलिसांनी सध्या ही महिला व तिच्या मुलांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, PUBG हा गेम खेळताना तिची भारतातील इसमाशी ओळख झाली होती व त्याचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला नेपाळमार्गे भारतात पोहोचली. सध्या ती ग्रेटर नोएडा येथे अवैधरित्या वास्तव्य करत होती. पोलिसांनी ती महिला व तिच्या चारही मुलांना ताब्यात घेतले आहे. पबजी (PUBG) गेम खेळता खेळता ही महिला व त्या इसमाची ओळख झाली व त्यानेच तिला त्याच्या घरात सोबत ठेवले. २८-२९ वर्षांची ही पाकिस्तानी महिला आणि ग्रेटर नोएडा येथे राहणारा हा इसम दोघेही PUBG या ऑनलाइन गेममुळे एकमेकांच्या संपर्कात आले. हळूहळू त्यांची मैत्री झाली व त्याचे प्रेमात रुपांतर झाले. प्रेमासाठी त्या महिलेने मुलासंह घर सोडले आणि ती पाकिस्तानातून भारतात आली. नेपाळमार्गे तिने भारतात प्रवेश केल्याचे पोलिसांनी सांगितले.

भारतात आल्यावर तो इसम व महिला, तिच्या चारही मुलांसह ग्रेटर नोएडा येथे घर भाड्याने घेऊन राहू लागले. मात्र पोलिसांना याची खबर मिळताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी ती पाकिस्तानी महिला व तिची मुले , तसेच ग्रेटर नोएडा येथील त्या इसमाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले