1000 रुपये देते फक्त दहा मिनिटं माझ्यासोबत.., कॅब चालकाला महिलेनं थेट घरात बोलावलं, टॅक्सी चालकाने व्हिडीओच पोस्ट केला
एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेनं आधी कॅब बुक केली, जेव्हा तो टॅक्सी चालक या महिलेच्या घरी गेला तेव्हा या महिलेनं त्या टॅक्सी चालकाला एक हजार रुपये देऊ केले, त्याला घरात बोलावलं.

सध्या सोशल मीडियावर एक महिला आणि कॅब ड्रायव्हरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे की, संबंधित महिला कॅब चालकाला घरात येण्याची ऑफर देत आहे. मी तुला एक हजार रुपये देते, तू फक्त माझ्या घरात दहा मिनिटांसाठी ये असं ही महिला या कॅब चालकाला म्हणते. मात्र तो घरात येण्यास नकार देतो. मात्र ही महिला वारंवार त्याला हेच म्हणते की फक्त दहा मिनिटांचं काम आहे, तू माझ्या घरात ये. दहा मिनीटं माझ्यासोबत वेळ घालवं आणि नंतर पुन्हा चालला जा. मात्र या महिलेनं घरात येण्यास सांगून देखील कॅब चालक या महिलेच्या घरात येण्यास नकार देतो. त्यावर ती महिला त्याला म्हणते की तुझ्या कॅब राईडचे पैसे किती होतात, तेव्हा तो टॅक्सी चालक म्हणतो की माझे साडेतीनशे रुपये झाले. जर तुम्हाला यायचे असेल तर चला नाहीतर बुक केलेली राईड कॅन्सल करा. मात्र ही महिला राईड कॅन्सल करायला देखील तयार नव्हती.
ती वांरवार चालकाला सांगत होती, की तू माझ्यासोबत माझ्या घरात चल माझ्यासोबत दहा मिनिटं वेळ घालव मी तुला एक हजार रुपये देते. परंतु चालकाने या महिलेला घरात येण्यास नकार दिला. आमच्या कंपनीकडून कोणच्याही घरात जाण्याची परवानगी नाही, तुम्ही मला एक लाख रुपये दिले तरी मी तुमच्या घरात येऊ शकत नाही, असं या कॅब चालकाने या महिलेला सांगितलं. त्यानंतर ती महिला या कॅब चालकाला म्हणाली की मला जर एक लाख रुपये द्यायचे असते तर मी तुझ्यापेक्षा हँन्डसम तरुण बोलावला असता. त्यानंतर देखील या चालकाने या महिलेच्या घरात जाण्यास नकार दिला.
दरम्यान या व्हिडीओमध्ये त्यानंतर या कॅब चालकाने असं सांगितलं की, अशा महिलांनी घरात बोलावलं तर कधीही जाऊ नका, कारण हा एक मोठा फ्रॉड असतो. तुम्ही या फ्रॉडमध्ये असे अडकले जातात की, तुम्हाला पन्नास लाख रुपयापर्यंत देखील पैसे भरावे लागू शकतात. त्यामुळे अशा कोणत्याही अनोळखी ठिकाणी कोणच्याही घरात थेट जाणे टाळा, असा सल्ला देखील या कॅब चालकाने दिला आहे.