आत्महत्येपुर्वी महिलेने हातावरच लिहिली सुसाइड नोट

मला जगायचे होते, पण जगणेच जगणे असाह्य झाले, यामुळे जीवन संपवतेय म्हटलंय. हातावर लिहिलेल्या सुसाइट नोटमुळे लोक आश्चर्यचकित झाले आहे. तिने लिहिलेली आत्महत्येची कारणे थक्क करणारी आहेत.

आत्महत्येपुर्वी महिलेने हातावरच लिहिली सुसाइड नोट
सुसाइट नोट
| Updated on: Jan 26, 2023 | 4:02 PM

सुरत : गुजरातमधील सूरतमध्ये एका महिलेने आत्महत्या केली आहे. या महिलेने आत्महत्यापुर्वी सुसाइड नोट लिहिली आहे. त्यात मला जगायचे होते, पण जगणेच जगणे असाह्य झाले, यामुळे जीवन संपवतेय म्हटलंय. हातावर लिहिलेल्या सुसाइट नोटमुळे लोक आश्चर्यचकित झाले आहे. तिने लिहिलेली आत्महत्येची कारणे थक्क करणारी आहेत. महिलेने खोलीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुरतच्या लिंबायत भागात एका महिलेने राहत्या घरी गळफास घेतला. त्या महिलेचा पतीकडून छळ होत होता. मरण्यापूर्वी महिलेने तिच्या हातावर हिंदीत लिहिले होते, ‘मला जगायचे आहे, पण माझा नवरा मला खूप त्रास देत आहे.’ आत्महत्या केलेल्या महिलेचा पती रिक्षाचालक आहे. झारखंडची रहिवासी असलेली ही महिला पती प्रवीण गोस्वामी सोबत सुरतच्या लिंबायत भागात राहत होती. तिला दोन मुले असून तिचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता.

गुरुग्राममधील घटनेची आठवण

या घटनेच्या काही दिवसांपूर्वी दिल्लीला लागून असलेल्या हरियाणाच्या गुरुग्राममध्येही असाच एक प्रकार समोर आला होता. 25 वर्षीय नवविवाहित रितूने हातावर सुसाईड नोट लिहून आपले जीवन संपवले. या आत्महत्येसाठी तिने सासरच्या मंडळींना जबाबदार धरले होते. माझ्या सासरच्यांनी माझे तोंडही पाहू नये, अशी शेवटची इच्छा त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे.

Follow Us