AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्ल्ड हेरीटेज कालका-सिमला टॉय ट्रेनचा प्रवास आता अधिक आरामदायी, शंभर वर्षांनंतर डब्यांचे डीझाईन बदलले

या डब्यांची निर्मिती करताना प्रवाशांना आरामदायी प्रवास होईल अशी रचना केली आहे. शंभर वर्षे जुन्या डब्यांचा काही रेकॉर्ड नव्हता, त्यामुळे या डब्यांची निर्मिती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

वर्ल्ड हेरीटेज कालका-सिमला टॉय ट्रेनचा प्रवास आता अधिक आरामदायी, शंभर वर्षांनंतर डब्यांचे डीझाईन बदलले
KALKA-SHIMLA TOY TRAINImage Credit source: socialmedia
| Updated on: Jun 01, 2023 | 12:56 PM
Share

दिल्ली : भारतीय रेल्वेने आता कात टाकायला सुरूवात केली आहे. कालका-सिमला या हेरीटेज टॉय ट्रेनच्या डब्ब्यांचे डीझाईन सुमारे शंभर वर्षांनी बदलण्यात आले आहे. रेल्वेच्या कपूरथला रेल्वे कोच फॅक्टरीत हे डब्बे डीझाईन करण्यात आले आहेत. या डब्यांचे अनावरण नुकतेच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक अशेष अग्रवाल यांनी केले आहेत. आता ट्रायलसाठी हे डब्बे कालका-सिमला सेक्शनमध्ये नेण्यात येणार आहेत. लवकरच पर्यटकांना कालका-सिमला येथील निर्सगाचा आणि पर्वतांच्या सौदर्याचा अधिक चांगल्या पद्धतीने आनंद घेता येणार आहे.

Kalka-Shimla Toy Train

Kalka-Shimla Toy Train

कालका-सिमला मिनी ट्रेन ही देशातील हेरीटेज नॅरोगेज ट्रेन आहे. या ट्रेनच्या डब्यांचे डीझाईन शंभर वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने हे नवे डब्बे तयार केले असून त्यासाठी एक कोटी रूपयांचा खर्च आला आहे. हे डब्बे सर्व अत्याधुनिक सुविधांनी संपन्न असून यात बायोटॉयलेटसह इतर सोयी असल्याचे कपुरथळा कोच फॅक्टरीचे महाव्यवस्थापक अशेष अग्रवाल यांनी सांगितले. या मिनीट्रेनचे डब्बे अधिक आरामदायी करण्यात आले आहेत. या डब्यात आसनांच्या पुढे खानपान व्यवस्थेसाठी टेबल देण्यात आले आहे. फर्स्ट एसी कोचमध्ये एकूण 12 आसनांची व्यवस्था आहे. डब्यातील खिडक्यांना पॅनारोमिक लूक देण्यात आला आहे.

Kalka-Shimla Toy Train

Kalka-Shimla Toy Train

शंभर वर्षांचे डीझाईन बदलले

या डब्यांची निर्मिती करताना प्रवाशांना आरामदायी प्रवास होईल अशी रचना केली आहे. या डब्यांची निर्मिती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कारण सध्याचे डब्बे सन 1908 दरम्यानच्या डीझाईनचे होते. त्यांचा कोणताही डेटा उपलब्ध नव्हता. स्पेसिफिकेशन आणि टेक्निकल डाटा उपलब्ध नव्हता. हा मार्ग 7,062 एम.एम. नॅरोगेजचा असल्याने नविन डब्बे तयार करताना खूप अभ्यास करावा लागल्याचे महाव्यवस्थपकांनी सांगितले. कालका-सिमलासाठी 42 डब्यांची ऑर्डर मिळाली असून याशिवाय आणखी 26 डब्यांची ऑर्डर मिळाली आहे.

Kalka-Shimla Toy Train

Kalka-Shimla Toy Train

पॅनारोमिकमधून पर्वतांचे सौदर्य पाहा

पॅनारोमिक कोचेसमधून सिमलातील पर्वतांचे सौदर्य न्याहाळता येणार आहे. नॅरोगेज मार्गावर हे डब्बे दर ताशी 25 किमी वेगाने धावू शकणार आहेत. लवकरच कालका-सिमला मार्गावर त्यांची चाचणी घेतली जाणार आहे. या डब्यांची निर्मिती ‘मेक इन इंडीया’ मोहीमेअंतर्गत करण्यात आली आहे.

Kalka-Shimla Toy Train

Kalka-Shimla Toy Train

Follow Us
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट