World Travel and Tourism Festival: गायक Papon याच्या म्यूझिकने व्हेलेटाईनची सायंकाळ रंगणार पाहा संपूर्ण वेळापत्रक
जर तुम्हाला तुमचा व्हॅलेंटाईन डे खास आणि यादगार बनवायचा असेल, तर तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन 'द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल' ला जाऊ शकता. इथे तुमच्यासाठी बरेच काही आहे, ज्यामध्ये गायक पापोन याच्या संगीतासह जंगी मनोरंजनाची मेजवाणी आहे

‘जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव’ दिल्लीमध्ये आयोजित केला जात आहे, हा महोत्सव Tv9 नेटवर्क आणि रेड हॅट कम्युनिकेशनने आयोजित केला आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी या महोत्सवात खूप काही खास आहे. तुमच्या जोडीदारासोबत या संगीत महोत्सवाला उपस्थित राहणे ही तुमच्यासाठी सर्वोत्तम व्हॅलेंटाईन संध्याकाळ ठरणार आहे. जर तुम्हाला या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल तर तुम्हाला दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये जावे लागणार आहे. या महोत्सवात व्हॅलेंटाईन डे स्पेशल संध्याकाळ रंगणार आहे. भारतीय संस्कृतीशी संबंधित माहिती तुम्हाला हवी असेल तरी देखील हा महोत्सव तुमच्यासाठी खास आहे. टुरिझमबद्दल माहिती मिळवायची असेल आणि टुरिझम व्यवसायाशी संबंधित माहीती हवी असेल तरी हे ठिकाण एक उत्तम अनुभव देणारे असणार आहे. या महोत्सवाचे उद्दिष्ट प्रवास आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे तसेच टुरिस्ट आणि टुरिझम जगतातील तज्ञ्जांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे हा आहे.
‘व्हॅलेंटाईन डे’ साठी, अनेकजण त्यांच्या जोडीदारांसोबत रेस्टॉरंट्स आणि व्हॅलेंटाईनच्या खास कार्यक्रमांना जात असतात. ‘द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल’ च्या माध्यमातून, TV9 तुमच्यासाठी एक अद्भुत संधी घेऊन येत आहे. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत उत्तम गाणी ऐकत तुमची सायंकाळ आणखी रोमॅण्टीक करु शकता. संगिताचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. तसेच नामवंत शेफनी तयार केलेल्या स्वादिष्ट डिशेसचा आस्वादही घेऊ शकता. तर चला तर मग जाणून घेऊया या महोत्सवात काय खास आहे आणि आजचे संपूर्ण वेळापत्रक काय आहे.
गायक पापोन याचा लाईव्ह शो
तुम्ही या महोत्सवाला एकटे जाऊ शकता किंवा तुमच्या मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत किंवा जोडीदारासोबत देखील भेट देऊ शकता. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासाठी ही व्हॅलेंटाईन सायंकाळ खूप स्पेशल बनवायची असेल तर तुम्ही या महोत्सवात जरुर सहभागी व्हावे. आम्ही आश्वस्थ करतो की बॉलिवूड गायक पापोन आपल्या अद्भुत गायकीने तुमची मने जिंकत तुमचे खास मनोरंजन करतील आणि त्यांचा कार्यक्रम संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल.
ट्रॅव्हल्स प्रेमींसाठी खास
हा ‘जागतिक प्रवास आणि पर्यटन महोत्सव’ आहे, त्यामुळे येथे येणे हा प्रवास उत्साही लोकांसाठी सर्वोत्तम अनुभव असणार आहे. येथे सायंकाळी ५ वाजता प्रवास चर्चासत्राचे आयोजन केले जाईल. याशिवाय, व्हेकेशन प्लॅनिंग, एंगेजमेंट एक्टिव्हिटी, यू गो फॉर इको-टुरिझम, प्लॅन अँड फ्लाय, जर्नी इनटो म्युझिक अँड कल्चर अशा अनेक गोष्टी असतील, ज्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक आणि अनुभवी लोकांकडून खूप काही शिकण्याची संधी मिळेल.
पहिल्या दिवसाचे वेळापत्रक – 14 फेब्रुवारी
| वेळ | सेशनचा प्रकार | सेशन थीम | वक्ते |
| 1:00 PM | उद्घाटन | – |
प्रिती श्रीवास्तव, डेप्युटी डायरेक्टर, यूपी पर्यटन
|
| 1:40 PM | एंगेजमेंट एक्टिविटी | – | |
| 2:00 PM | पॅनल | वॅकेशन प्लानिंग | दुष्यंत भल्ला, डायरेक्टर-सीईओ Aabee, हिम्मत आनंद, फाउंडर डॉग स्टोरी, दीपक भटनागर, सीईओ मीनार ग्रुप |
| 2:20 PM | एंगेजमेंट एक्टिविटी | – | |
| 2:30 PM | पॅनल | यूथ गॉ फॉर ईको-टूरिज्म | मदन मोहन एमडी Deneb and Pollux Tours & Travels Pvt. Ltd, परमजीत बावा फाउंडर-प्रिंसीपल Auxilia Network, Tourism Marketing Professional |
| 2:50 PM | एंगेजमेंट एक्टिविटी | – | |
| 3:10 PM | पॅनल | प्लान एण्ड फ्लाय | जसमीत सिंह , MMT, Head of Holidays; Amr Aly, Country Manager, North & East India, Egypt Air |
| 3:30 PM | एंगेजमेंट एक्टिव्हीटी | ||
| 4:00 PM | ट्रॅव्हल टॉक | जर्नी इंटू म्यूझिक एंड कल्चर | डॉ. नवीन जाफा |
| 4:40 PM | पॅनल | इंडिया वॉव्ड बाए वेलनेस | डॉ. प्रिया पूजा हेड मेडिकल एडवाइजर North Kaya Clinic, डॉ. शैली सिंह Director, Obstetrics & Gynaecology, Fortis La Femme GK, साध्वी प्रज्ञा भारती |
| 5:00 PM | ट्रॅव्हल टॉक | पे एज़ यू गो | विशेष झोल PayU |
| 7:00 PM | लाईव्ह कॉन्सर्ट | Papon Concert |
