छेडछाड करणाऱ्यांची आता योगींच्या राज्यात खैर नाही, दाखवली कायद्याची जरब…

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेविषयी बोलताना सांगितले की, छेडछाड आणि गुन्हा करणारी व्यक्ती चौका चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहेत.

छेडछाड करणाऱ्यांची आता योगींच्या राज्यात खैर नाही, दाखवली कायद्याची जरब...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
Image Credit source: tv 9 Marathi
| Updated on: Dec 09, 2022 | 10:17 PM

कानपूरः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी कानपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी 387.59 कोटी रुपयांच्या विकासकामांचे उद्घाटन केले. त्यानंतर लोकार्पण कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी सरकारच्या योजना आणि भविष्यातील धोरणांचीही त्यांनी माहिती दिली. लोकार्पण सोहळ्यात त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार उत्तर प्रदेशाच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवरही भर दिला.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बोलताना सांगितले की, आता कोणीही समाजविरोधी आणि समाजविघातक काम करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही.

जर कोणी कोणत्याही शहरातील चौकातमध्ये महिलांची छेडछाड करून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या चौकात जाण्याआधी त्याला बेड्या ठोका असा थेट इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेविषयी बोलताना सांगितले की, छेडछाड आणि गुन्हा करणारी व्यक्ती चौका चौकात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद होणार आहेत.

आपला परिसर हा भयमुक्त राहिला पाहिजे ही सरकारची प्राथमिकता आहे. त्यामुळे याबाबतीत पुन्हा कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट सांगितले.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सीएसए (चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ) येथील हेलिपॅडवर उतरले. यानंतर मुख्यमंत्री व्हीएसएसडी कॉलेज मैदानावर प्रबोधन परिषदेला पोहोचले. ज्याला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

कानपूरमधील व्हीएसएसडी महाविद्यालयाच्या क्रिडांगणावर प्रबुद्धजन संमेलनमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध योजनांचे उद्घान केले आणि लोकार्पण सोहळाही त्यांनी पार पडला.