AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करताना करु नका या चूका, अन्यथा होईल पश्चाताप

इलेक्ट्रीक स्कूटरची खरेदी करताना नीट आणि काळजीपूर्वक करावी लागते. बॅटरी आणि मोटर यांच्या गुणवत्तेसह अनेक बाबींचा नीट अभ्यास करुनच इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करणे योग्य असते.

इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करताना करु नका या चूका, अन्यथा होईल पश्चाताप
electric scooter
| Updated on: May 16, 2026 | 7:32 PM
Share

आजच्या पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे महागाईच्या काळात इलेक्ट्रीक स्कूटर लोकांना आकर्षित करत आहे. शहरातील वाढते ट्रॅफीक आणि पार्किंगची समस्या यामुळे इलेक्ट्रीक स्कूटर केवल पर्यावरणाचे संरक्षण करत नाही तर पैशाची बचतही करत आहे. त्यामुळे शहरातल्या शहरात चालवण्यासाठी इलेक्ट्रीक स्कुटर एक बेस्ट पर्याय आहे. मात्र, इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करताना घाई न करता नीट काळजी घेणे गरजेचे आहे. तर इलेक्ट्रीत स्कूटर घेताना नेमकी काय काळजी घ्यावी हे पाहूयात….

स्कूटरची बॅटरी

इलेक्ट्रीक स्कुटरमध्ये त्याची बॅटरी सर्वाधिक महत्वाची असते. नेहम लिथियम – आयर्न बॅटरीवाल्या मॉडेलला प्राधान्य द्यावे. कारण ती जास्त टिकाऊ आणि विश्वासार्ह असते. ARAI वा IDC रेंज जरुर तपासा आणि आपल्या रोजच्या गरजेपेक्षा थोड्या जास्त रेंजवाल्या स्कूटर निवडा. तसेच बॅटरीवर देखील ३ ते ५ वर्षांची वॉरंटी असणे एक चांगला संकेत आहे.

मोटरची पॉवर आणि परफॉर्मेन्स

इलेक्ट्रीक स्कूटरचा दुसरा महत्वाचा पार्ट म्हणजे त्याची मोटरची गुणवत्ता. मोटरची पॉवर आणि परफॉर्मेन्स चेक करणे गरजेचे आहे. जर तुम्ही शहरातल्या शहरात वापरत असाल तर कमी पॉवरची ठीक आहे.मात्र, चढ उताराचे रस्ते असतील वा दोन लोकांनी प्रवास करायचा असेल तर जास्त पॉवरवाली मोटर घेणे उत्तम असते. टेस्ट राईड घेऊन मोटरची चाचणी करणे उत्तम आहे.

सेफ्टी फिचर्सवर लक्ष असू द्या

यानंतर स्कूटरची बनावट आणि सेफ्टी फिचर्स देखील ध्यानात घ्यावेत. मजबूत फ्रेम, चांगले सस्पेंशन आणि विश्वासार्ह ब्रेकिंग सिस्टी खूप गरजेचे आहे. डिस्क ब्रेक, एलईडी लाईट्स, डिजिटल मीटर आणि एंटी -थेफ्ट फिचर्स स्कूटरला आणखी सुरक्षित बनवतात.

चार्जिंग टाईम आणि वॉरंटी

चार्जिंग टाईम आणि सुविधा देखील महत्वाची असते. अशा इलेक्ट्रीक स्कूटरला घ्यावे ज्याला चार्ज होण्यासाठी कमी वेळ लागेल. जर बॅटरी काढता येणारी असेल तर आणखी उत्तम आहे. त्यामुळे तिला काढून तुम्ही घरीही सहजपणे चार्ज करु शकता. शेवटचे कंपनीचा सर्व्हीस सेंटरचे नेटवर्क किती आहे. आणि एकूण खर्च किती येईल याचाही विचार करावा. तुमच्या शहरात या स्कूटरच्या कंपनीचे सर्व्हीस सेंटर असायला हवे. आणि स्पेअर पार्टची उपलब्धता देखील असायला हवी. तसेच स्कूटरला लागणारा एकूण खर्च, मेन्टेनन्स आणि वॉरंटीला ध्यानात घेऊन योग्य निर्णय घ्यावा. विश्वासार्ह ब्रँडची निवड तुम्हाला दीर्घकाळ उत्तम सेवा देऊ शकते आणि तुमच्या डोक्याला कोणताही त्रास होणार नाही.

Follow Us
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया