मार्केट गाजवायचं तर असं, या डान्सरने तिच्या ठेक्यावर सर्वांनाच नाचवलं, Video पाहून सर्व थक्क
ठोका चुकला की पैसे परत, सोशल मीडियावर राडा करणारी ही डान्सर कोण? जिच्या तालावर नाचतोय प्रत्येकजण. डान्सरचा डान्स पाहून अनेकजण थक्क.

Viral Video : सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या डान्स व्हिडीओंची अक्षरशः क्रेझ पाहायला मिळत आहे. विशेषतः महाराष्ट्रात लोककला, लावणी आणि स्टेज शो करणाऱ्या कलाकारांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. गौतमी पाटील, राधा पाटील आणि ऐश्वर्या जाधव यांसारख्या लोकप्रिय डान्सरचे कार्यक्रम आणि त्यांचे हटके डान्स स्टेप्स प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करत असतात. अशातच आता आणखी एका डान्सरचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तिच्या एनर्जीने आणि भन्नाट स्टाईलने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक डान्सर नुसत्या म्युझिकच्या तालावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे तिच्या डान्समध्ये असलेला आत्मविश्वास, स्टेजवरील एनर्जी आणि प्रेक्षकांशी साधलेला संवाद यामुळे संपूर्ण कार्यक्रमात वेगळीच रंगत निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले अनेकजण तिच्या तालावर ताल धरताना दिसत असून काही जण तर तिच्या स्टेप्सची नक्कल करतानाही दिसत आहेत.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी तिच्या डान्सचं कौतुक करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. “ही कोण?”, “धडाकेबाज डान्स”, “हे काय बघायला मिळतंय”, “महाराष्ट्राचा बिहार झालाय” अशा भन्नाट कमेंट्स या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत. काही नेटकऱ्यांनी तर तिच्या डान्सची तुलना लोकप्रिय डान्सरशी करत “गौतमी पाटीललाही टक्कर देईल असा परफॉर्मन्स” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
व्हिडीओमधील ही डान्सर कोण?
तर काहींनी मजेशीर अंदाजात “ठोका चुकला की पैसे परत” अशी कमेंट करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असले तरी प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कलाकारांप्रती असलेलं आकर्षण यातून अशा कार्यक्रमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठल्या कार्यक्रमातील आहे किंवा संबंधित डान्सर कोण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, तिच्या डान्सने सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगवली असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिल्याचं सांगितलं जात आहे.
