AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्यूटी पार्लर ते खासगी हेलिकॉप्टरचे बील; अजित पवार गटातील ती महिला कोण? नव्या चर्चांना उधाण!

आमदार रोहित पवार यांनी एक अत्यंत सूचक आणि खळबळजनक विधान केले. पक्षाच्या तिजोरीची चावी पवार कुटुंबाकडे आल्यामुळे "आता येत्या काळात ब्यूटी पार्लर किंवा खासगी प्रवासासाठी हेलिकॉप्टर वापरणे हे पक्षाच्या खर्चात येणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे. आता ब्यूटी पार्लरचे बील पक्षाच्या खर्चात लावणारी ती महिला नेता कोण? याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

ब्यूटी पार्लर ते खासगी हेलिकॉप्टरचे बील; अजित पवार गटातील ती महिला कोण? नव्या चर्चांना उधाण!
अजित पवार गटImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 16, 2026 | 7:02 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार आणि शरद पवार गट वेगळे झाल्यानंतर आता अजित पवार गटामध्ये (सत्ताधारी गट) तीव्र अंतर्गत संघर्ष निर्माण झाल्याचे चित्र आहे. पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आणि पक्षाच्या तिजोरीची सूत्रे पूर्णपणे पवार कुटुंबाच्या हातात गेल्यानंतर अंतर्गत गटबाजी कमालीची वाढली असून, विविध थरातील वाद आता थेट चव्हाट्यावर आले आहेत. रोहित पवार यांनी केलेल्या काही सूचक विधानांमुळे आणि पक्षांतर्गत झालेल्या मोठ्या बदलांमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अजित पवार गटाच्या अर्थकारणावर आणि पक्षाच्या निधीवर (Treasury) आता पूर्णपणे पवार कुटुंबाचे नियंत्रण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे खजिनदार पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी पक्षाच्या निधीचे आणि खर्चाचे अधिकार सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असायचे. आता मात्र पक्षाचा कोणताही अधिकृत खर्च करायचा असल्यास या तिघांपैकी एकाची किंवा सर्वांची स्वाक्षरी अनिवार्य करण्यात आली आहे. या निर्णयामुळे इतर वरिष्ठ नेत्यांमधील अधिकार काढून घेण्यात आल्याने पक्षात एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झाली आहे.

रोहित पवारांचे विधान चर्चेत

या आर्थिक बदलांनंतर आमदार रोहित पवार यांनी एक अत्यंत सूचक आणि खळबळजनक विधान केले. पक्षाच्या तिजोरीची चावी पवार कुटुंबाकडे आल्यामुळे “आता येत्या काळात ब्यूटी पार्लर किंवा खासगी प्रवासासाठी हेलिकॉप्टर वापरणे हे पक्षाच्या खर्चात येणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी एका वरिष्ठ महिला नेत्या किंवा संबंधित व्यक्तीने स्वतःच्या ब्यूटी पार्लरचे हजारो रुपयांचे बिल थेट पक्षाच्या निधीमधून भागवले होते असे म्हटले जात आहे. आता ही महिला नेता नेमकी कोण आहे? याचे वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. सोशल मीडियातही याची खमंग चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

एवढेच नव्हे तर नेत्यांच्या खासगी प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या हेलिकॉप्टरची (चॉपर्स) बिले आणि मुंबईत स्वतःची व्यवस्था असतानाही तिथल्याच अलिशान हॉटेल्सची लाखो रुपयांची बिले पक्षनिधीतून भरली जात असल्याचेही म्हटले जात आहे. या अवाजवी खर्चामुळे स्वतः अजित पवार यांनीही एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली होती, परंतु त्यात फारसा बदल झाला नव्हता, असं सूत्रांनी सांगितलं.

या संपूर्ण वादाच्या पाठीमागे केवळ बिलांचाच विषय नसून एक गुप्त ऑडिओ रेकॉर्डिंग कारणीभूत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार गटातीलच काही अत्यंत वरिष्ठ नेते खासगीत बोलताना आपल्याच नेत्याबद्दल चुकीची विधाने करायचे. ही गुपिते कधीही अजित पवारांपर्यंत पोहोचली नव्हती, मात्र त्यांच्या पश्चात आता या ऑडिओ क्लिप्स सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यापर्यंत पोहोचल्या असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच पक्षातील तिजोरी पवार कुटुंबाकडे गेल्याचं सांगितलं जात आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?