I Love You अन् A टू Z कुंडली, ज्योती मल्होत्राच्या सिक्रेट डायरीत खळबळजनक माहिती!

पोलिसांना ज्योती मल्होत्राची एक डायरी सापडली आहे. या डायरीत अनेक महत्त्वाच्या गोष्टींची नोंद आहे. या डायरीत ज्योतीन आय लव्ह यू असंही म्हटलंय.

I Love You अन् A टू Z कुंडली, ज्योती मल्होत्राच्या सिक्रेट डायरीत खळबळजनक माहिती!
JYOTI MALHOTRA
| Updated on: May 20, 2025 | 3:51 PM

Jyoti Malhotra : हेरगिरीच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे. या यूट्यूबरच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. दरम्यान, ज्योती मल्होत्राची एक डायरी हाती लागली असून यातूनही बरीच अचंबित करणारी माहिती समोर येत आहे.

जेव्हा-जेव्हा घराच्या बाहेर फिरायला जायची…

ज्योती मल्होत्राच्या डायरीच्या माध्यमातून तिने आतापर्यंत कुठे, कुठे प्रवास केलाय याबाबत माहिती मिळत आहे. तिच्या इन्स्टाग्राम खात्यावरूनही पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे. ज्योती जेव्हा-जेव्हा घराच्या बाहेर फिरायला जायची तेव्हा-तेव्हा ती सर्व नोंदी तिच्या डायरीत लिहायची. तसेच जेव्हा कधी ती फिरायला जात असे तेव्हा ती मी दिल्लीला जात आहे, असे आपल्या वडिलांना सांगायची. प्रवासात ज्योतीसोबत ही डायरी असायची. देश-विदेशात गेल्यानंतर काय-काय घटना घडल्या याची माहिती ती डायरीत नोंदवायची.

 एक लाख रुपये खर्च…

ज्योती मल्होत्राने डायरीत एका ठिकाणी आय लव्ह यू असं लिहिलेलं आहे. यासह तिच्या डायरीत काही औषधांचीही माहिती तिने लिहिलेली आहे. एका ठिकाणी तिने डायरीत मी लवकरच परतेन असंही लिहून ठेवलंय. इंडोनेशिया तसेच बालीच्या ट्रिपवर असताना ज्योतीने एक लाख रुपये खर्च केल्याचंही तिने आपल्या डायरीत लिहून ठेवलंय.

ज्योतीच्या मोबाईलची केली जातेय फॉरेन्सिक चाचणी

ज्योती मल्होत्राला 16 मे रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या पोलीस तिची चौकशी करत आहेत. तिच्या मोबाईलची फॉरेन्सिक चाचणी केली जात आहे. तसेच तिने आतापर्यंत केलेल आर्थिक व्यवहार, तिच्या ट्रिपचे डिटेल्स, पाकिस्तानी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठका या सर्वांचा तपास पोलीस करत आहेत.

पोलीस ज्योतीला पुन्हा घेऊन गेले घरी

ज्योतीचे कनेक्शन्स शोधून काढण्यासाठी पोलीस तिला तिच्या घरी घेऊन गेले होते. ज्योतीच्या समक्ष पोलिसांनी तिच्या घराची झडती घेतली. यात पोलिसांनी तिची ही डायरी सापडली आणि वरील खुलासे झाले आहेत.आता आगामी काळात आणखी कोणती माहिती समोर येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.