AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमची मुलगी आहे पाकिस्तानी गुप्तहेर? ज्योती मल्होत्राच्या वडिलांकडून मोठा खुलासा

Jyoti Malhotra Father: ज्योती मल्होत्राच्या वडिलांकडून मोठा खुलासा..., अटकेनंतर ज्योतीला भेटले वडील, तेव्हा म्हणाली, 'काही नाही उद्या परवा मला सोडतील आणि...', सर्वत्र ज्योती प्रकरणाची चर्चा सुरु

तुमची मुलगी आहे पाकिस्तानी गुप्तहेर? ज्योती मल्होत्राच्या वडिलांकडून मोठा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: May 18, 2025 | 2:20 PM
Share

Jyoti Malhotra Father: हिसार येथील ज्योती मल्होत्रा ​​नावाच्या एका युट्यूबर आणि ट्रॅव्हल व्लॉगरला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. असा आरोप आहे की ती पाकिस्तानच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि भारताची गुप्त माहिती पाकिस्तानला देत होती. ही माहिती समोर आल्यानंतर ज्योतीचे कुटुंबिय देखील हैराण आहे. ज्योतीवर लावण्यात आलेले आरोप तिच्या कुटुंबियांनी पुर्णपणे फेटाळले आहे.

ज्योतीच्या वडिलांवर यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘जर एखादी व्यक्ती कुठेतरी फिरायला गेली तर त्याचा अर्थ असा नाही की ती हेरगिरी करायला सुरुवात करेल. ज्योती दूतावासाची परवानगी घेऊन, पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन गेली, ती स्वतःच्या मर्जीने गेली नव्हती.’

‘ज्योतीला व्हिसा देण्यापूर्वी तिची घरी चौकशी करण्यात आली. सर्वकाही व्यवस्थित असल्याचं आढळल्यानंतरच ज्योतीला पाकिस्तानला जाण्याची परवानगी देण्यात आली. दोन लोकांना साक्षीदार बनवण्यात आलं, सर्व काही कायदेशीर प्रक्रियेतून घडलं आहे.’ असं देखील ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं आहे.

ज्योती मल्होत्रा कधी – कधी गेली पाकिस्तान?

यावर ज्योतीचे वडील म्हणाले, ‘ज्योती 2-3 वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेली होती. तिच्या अटकेबद्दल मला काहीही सांगण्यात आलं नव्हतं. गेल्या गुरुवारी घरी बरेच लोक आले होते, जेव्हा मला तिच्या अटकेची बातमी मिळाली तेव्हा मी तिला भेटून आली. मग ती म्हणाली बाबा… काही हरकत नाही, ते मला उद्या किंवा परवा सोडतील.’

यावेळी ज्योतीच्या वडिलांनी तिच्याकडे असणाऱ्या पैशांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं आहे. ‘ज्योतीच्या खात्यात पैसे नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे महिन्याला 15 – 20 किंवा 25 हजार रुपयांची कमाई करते..’ सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत ज्योती पैसे कमावते.

ज्योतीला होतोय फसवण्याचा प्रयत्न

वडिलांनी सांगितल्या नुसार, ज्योती हिसारमध्ये राहते, कधीकधी ती दिल्लीला जाते पण 3 ते 4 दिवसांत परत येते. ज्योतीच्या वडिलांना वाटतं की तिला फसवलं जात आहे. तिने बाहेर कोणत्याही प्रकारची माहिती किंवा तपशील शेअर केला नाही… सध्या सर्वत्र ज्योती प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

Follow Us
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक